यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणार्‍यांवर कठोर कावाई करा..आदीवासी कोळी समाजाच्या विविध संघटनांचे जिल्हाधिकारींना निवेदन

 



यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणार्‍यांवर कठोर कावाई करा..आदीवासी कोळी समाजाच्या विविध संघटनांचे जिल्हाधिकारींना निवेदन

जळगाव दि.३१ (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणार्‍यांवर कठोर कार्रवाई होणे साठी आज दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब व मा.पोलीस अधिक्षक साहेब जळगाव यांना आदीवासी कोळी समाजाच्या विविध संघटनांनी निवेदन देण्यात आले.

       मा.श्री.परेशभाई कांतिजी कोळी, प्रदेश अध्यक्ष, अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली (रजि.)शाखा महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार 

       मा.श्री.महादेव बुवा शहाबाजकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष,

      मा.श्री.सिद्धार्थ दादा कोळी,प्रदेश कार्यअध्यक्ष यांचे मार्गदर्शनाने 

       मा.श्री.अनिलदादा देविदास नंन्नवरे, खांदेश विभागीय उपाध्यक्ष तथा खांदेश विभाग युवक कार्यअध्यक्ष

यांचे उपस्थितीत जळगाव येथील मा.उपजिल्हाधिकारी श्रीमती भारदे मॅडम यांना तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब यांना कोवीड-१९ चे नियमांचे पालन करून तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे पोट कलम ३७ (३)(१) जिल्हा संचारबंदीचे नियमांचे पालन करून निवेदन देण्यात आले.

       सदर निवेदनात पिडीतेला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे साठी आरोपींना कठोरातील कठोर शासन व्हावे यासाठी पिडीतेचा खटला हा जलद न्यायालयात (फास्टट्रैक कोर्ट) चालवावा व या खटल्याचे कामकाज बघण्यासाठी सरकारी वकील म्हणून जेष्ठ विधिज्ञ मा.श्री.उज्ज्वलजी निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी व पिडीतेला व तीच्या कुटूंबीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासारख्या इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

       यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष मा.श्री.धनराजभाऊ विठ्ठल साळूंके,

जिल्हा युवक उपाध्यक्ष मा.श्री. किशोर भाऊ पंढरीनाथ सपकाळे,

      जिल्हा कार्यकारणी सदस्य मा.श्री.भिकनदादा शामराव नंन्नवरे,

   जिल्हा सहसचिव मा.श्री.योगेशभाऊ सुकदेव बाविस्कर, 

      मा.श्री.धनंजय भाऊ पंढरीनाथ नंन्नवरे,

      मा.श्री.आण्णाभाऊ कोळी,

      आदीवासी वाल्मिकलव्य सेनेच्या महीला प्रदेश कार्यअध्यक्षा श्रीमती वैशालीताई निर्मला बाबूराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने