आ.हिरामणजी खोसकर यांचा छावा मराठा संघटनेतर्फे गौरव.. संघटनेचा २८ वर्धापनदिनानिमित्त गौरव पात्रांचा झाला सन्मान




आ.हिरामणजी खोसकर यांचा छावा मराठा संघटनेतर्फे गौरव.. संघटनेचा २८ वर्धापनदिनानिमित्त गौरव पात्रांचा झाला सन्मान

नाशिक दि.१(प्रतिनिधी दिलीप पाटील)

 दि. 1/1/2022 रोजी छावा मराठा संघटनेचा 28 वा वर्धापन दिन सोहळ्यात समाजहितासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की इगतपुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार हिरामणजी खोसकर यांनी कोरोना काळात सुध्दा उत्तम  कामगिरी करणारे योग्य लोक प्रतिनिधित्व ठरलेले आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी आरोग्यदुत म्हणुन ओळख असणारे ग्रामीण भागातील गरीबांची रुंग्ण सेवा केली आहे आणि अजुनही चालुच आहे.भागाचा मोठ्या प्रमाणात विकास करत असताना अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले आहेसमाजातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून ते लोकप्रिय ठरलेले आहे.  म्हणून छावा संघटनेच्या वतीने त्यांना मराठा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत.

आ.हिरामणजी खोसकर यांना सन्मानित करताना छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर व त्यांचे सर्व सहकारी व सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक लोकसभा सरचिटणीस हरीभाऊ बोडके पाटील उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने