आदिवासी पाडा वस्तीचे प्रश्न सोडवा! भाकप आदिवासी महासभेचे आंदोलनाचा इशारा निवेदन
चोपडा दि.१(प्रतिनिधी)....! तालुक्यातील बोरमळी या गावातील आदिवासींनी गेल्या 14ऑगस्ट2014 पासून स्वतंत्र ग्रामपंचायत ची मागनी मंजूर . .. करा व पाडा वस्तीतील सुविधांसाठी आदिवासी महासभा व भा क पतर्फे चोपडा पंचायत समिती व तहसील कार्यालय यांना नुकतेच निवेदन देणेत आले निवेदनात मागण्यांवर विचार न झाल्यास आदिवासींचे आंदोलन छेडणेत येईल असा इशारा देणेत आला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की,बोरर्मली गावास देव्हारी ग्रुप ग्रामपंचायत या 11किमीवरील गावाशी जोडले असून ग्रामपंचायती शी संबंधित कामास अडचणी येतात. म्हणून या गावाची स्वतंत्र ग्राम पंचायत करावी
.अक्ल्या पाडा. मालापुर अंतर्गत ,साग्या देव निंबापूर, बोरपणी, मेलाने अंतर्गत अमाशा पाडा अगाय माता या पाड्यांची पाहणी करावी त्यांचे त्यांना महसुली गावां च्या रस्त्याने जोडावेत व पेसा कायद्यानुसार रस्ते, दिवाबत्ती ,अंगणवाडी, शाळा शुद्ध पाण्याची सोय करा याचा पाठपुरावा करणेसाठी आदी निवेदनात करण्यात आले असून जर या मागण्या मंजूर केल्या नाहीतर आदिवासींचे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही आदिवासी महासभा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्षाचे नेते का अमृत महाजन तसेच बोर्मालीचे पोलीस पाटीलश्री बाबुराव बुटा पावरा व दीलबर बुधा पावरा आदींचे सह्यानिशी देणेत आला आहे