*सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, व उच्च माध्यमिक विद्यालय, भडगाव येथे महात्मा गांधी पु्यतिथी साजरी*.


 *सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, व उच्च माध्यमिक विद्यालय, भडगाव येथे महात्मा गांधी पु्यतिथी साजरी*.


      भडगाव दि.३०(प्रतिनिधी)   आज दिनांक 30 जानेवारी 2022 रविवार रोजी *परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी* यांची पुण्यतिथी *हुतात्मा दिन* म्हणून विद्यालयाच्यावतीने साजरा करण्यात आला. 

      या कार्यक्रमात प्रथमत: विद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक श्री. विश्वासराव साळुंखे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण व प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर बापूंच्या आवडत्या भजनाचे गायन संगीत शिक्षिका श्रीमती पूनम पाटील यांनी केले.  

            भजनाच्या कार्यक्रम संपन्न झाल्यावर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनींनी शालेय परिसराची साफसफाई व स्वच्छता केली.

        विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. महात्मा गांधीजींची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी बापूंना श्रद्धांजली अर्पण केली.

       कार्यक्रमात मुख्याध्यापक/प्राचार्य, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनींनी, तसेच सांस्कृतिक समितीने सहभाग नोंदवला. संस्कृतिक समितीने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने