*प्रा.डॉ.विजय पाटील राज्यस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित*
चोपडा दि.३०(प्रतिनिधी :---
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित , पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा येथील क्रीडा संचालक प्रा.डॉ.विजय पाटील यांची शैक्षणिक,सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची विशेष दखल घेत राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगाव या संस्थेतर्फे राज्यस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कारा साठी निवड राजनंदनी बहुद्देशीय संस्था अध्यक्षा सौ. संदीपा वाघ यांनी केली व ३० जानेवारी रविवार रोजी सदर पुरस्काराचे वितरण जळगाव येथे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह,शाल देऊन गौरवण्यात आले .
या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. शैलेंद्र भगणे औरंगाबाद,वुमन फाऊंडेशनच्या अध्यक्षा मिनाक्षीताई चव्हाण,दिलीप पाटिल, प्रविणसिंग पाटील, उदय पाटील, प्रविण पाटील,राजनंदनी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर वाघ याची विशेष उपस्थिती होती .
या यशाबद्दल शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले,उपाध्यक्ष अविनाश राणे,संचालक पंकज बोरोले सर्व संचालक मंडळ, एम. व्ही.पाटील, व्ही.आर. पाटील, प्राचार्य मिलिंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमोडे,प्राध्यापक वृंद,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समूहातील सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे....