शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त धुळे येथील कुष्ठरोग आश्रम साक्री रोड येथे अन्नदान






शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त धुळे येथील कुष्ठरोग आश्रम साक्री रोड येथे अन्नदान

 धुळे दि.१७ (प्रतिनिधी) दिनांक १६/१२/२०१ रोजी सकाळी ११:३० वाजता धुळे येथील कुष्ठरोग आश्रम साक्री रोड येथे अन्नदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला

पद्मविभूषण माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त मा. आ.श्री अनिल अण्णा गोटे साहेब प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री तेजस अप्पासाहेब गोटे कार्याध्यक्ष धुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या संकल्पनेतून तथा आध्यक्षतेखाली  व श्री योगेश भाऊ कुचेरिया तथाश्री प्रवीण भाऊ राणा यांच्या वतीने कुष्ठरोग आश्रम येथील गोर गरीब अनाथ आबालवृद्धांना अन्नदान वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर अनिल पाटील सर, श्री प्रवीण राणा राठोड, श्री योगेश कुचेरिया, मनोज वाल्हे, श्री अविनाश लोकरे आदी व कुष्ठरोग आश्रम येथील कार्यवाहक श्री पाठक भाऊ व त्यांचे सहकारी उपस्थित होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री योगेश भाऊ कुचेरिया यांनी दिली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री अविनाश भाऊ लोकरे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख यांनी प्रसिद्धीस दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने