धुळे दि.१७ (प्रतिनिधी)आज दिनांक १६/१२/२०१ रोजी सायंकाळी ५ वाजता येथील नवजीवन विद्या विकास मंडळ नगाव ता.जी.धुळे संचलित वृद्धाश्रम येथे अन्नदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला
पद्मविभूषण माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त मा. आ.श्री अनिल अण्णा गोटे साहेब प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री तेजस अप्पासाहेब गोटे कार्याध्यक्ष धुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या संकल्पनेतून तथा आध्यक्षतेखाली व श्री जगदीश खोडके सर यांच्या वतीने नगाव ता.जी.धुळे येथील वृद्धाश्रम येथे गोर गरीब आबालवृद्धांना व अस्थिव्यंगांना अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वृद्धाश्रमातील शिक्षिका तसेच केअर टेकर सौ आशाताई शिंदे यांनी नवजीवन विद्या विकास मंडळ यांच्या माध्यमातून वृद्धाश्रम अस्तिव्यांग,नशामुक्ती विषयी माहिती देतांना सांगितले की सदर वृद्धाश्रम गेल्या ३२ वर्षांपासून सुरू असून तसेच सदर अस्थिव्यंग यांच्या माध्यमातून विविध कलात्मक दैनंदिन व घरगुती उपयोगी वस्तूंची निर्मिती करू त्यांची विक्री देखील केली जाते अशी माहिती देत तसेच नशा मुक्ती केंद्रातील रुग्णांची व्यवस्थित काळजी घेऊन तज्ञ डॉक्टरांकडून वेळोवेळी कार्यशाळेच्या माध्यमातून कौन्सिलिंग केले जाते व यामुळे असंख्य रुग्णांचे योग्य निदान करून त्यांना व्यवस्थित स्वगृही पाठविले जाते.तसेच सध्या समाजातील जनजागृतीमुळे बहुसंख्य समाजातील लोक वृद्धाश्रम इथे वाढदिवस, दहाव्याचा कार्यक्रम असे सामाजिक भान ठेवून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मदतीसाठी कायम तत्पर असतात तसेच आज वृद्धाश्रम येथे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मान्यवरांचा अल्प परिचय देत छोटेखानी आभाराचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खंदे समर्थक श्री जगदीश खोडके सर, डॉक्टर अनिल पाटील सर, श्री अविनाश लोकरे, श्री मनोज वाल्हे आदी व वृद्धाश्रमातील श्री नेरकर सर सौ आशाताई शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.
अशी माहिती धुळे राष्ट्रवादीचे खंदे समर्थक श्री जगदीश खोडके सर यांनी दिली व धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री अविनाश भाऊ लोकरे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख यांनी प्रसिद्ध केली