डांभुर्णी, किनगाव परिसरात अवैध लाकुड तोडीचा धुमाकूळ.. कोणाच्या आशिर्वादाने चाललीयं लूट..? पाटबंधारे विभागासह वन विभाग कुंभकर्णी झोपेत*

 

*




डांभुर्णी, किनगाव परिसरात अवैध लाकुड तोडीचा धुमाकूळ.. कोणाच्या आशिर्वादाने चाललीयं लूट..? पाटबंधारे विभागासह वन विभाग कुंभकर्णी झोपेत*

मनवेल  ता यावल :दि.३०(प्रतिनिधी


)   डांभुर्णी, किनगाव महामार्गजवळील हतनूर कालव्याच्या पूर्व बाजूने अवैध डेरेदार वृक्षांची रात्री कत्तल केली जात असून लाकडाची  चोरी केली जात आहे . या लाकूड चोरीतचोरट्यानीं   बाभूळ, कडू लिंब, व अडजातींचे डेरेदार वृक्ष कापले  असून साधारण 50/60 झाडे तोडून नेलेली असल्याचे निदर्शनास येत आहे. पाट जवळील शेती असलेल्या काही शेतकऱ्यांच्या बांधवरीलही मोठ मोठी झाडें तोडून नेली असल्याचे शेतकरीही सांगत आहेत. रात्रीच्या वेळेस शुक  शुकाट असल्याने व परिसर निर्मनुष्य झाल्यावर येथे   बिनधास्त पणे कटर मशीनीच्या साहाय्याने होणारी वृक्षातोड ही कुणाच्या आशीर्वादाने होत आहे ? हा प्रश्न मात्र विचार करण्यासारखा आहे. पाटबंधारे विभागातील कर्मचारी पाठचारीवर सेवेत कार्यरत असल्याचे शेतकरी सांगतात मग त्या कर्मचाऱ्यांना तोडलेली झाडें दिसली नाहीत का? की त्यांच्या सहकार्याने ही डेरेदार वृक्ष तोडली जात आहेत ? असा प्रश्न जनतेतून बोलला जात आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने