भागवताचार्य ह. भ. प. सौ राधाताई पाटील खानदेशच्या गाणकोकिळा.... २५ वर्षापासून करीत आहेत कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य....
चोपडा दि.३१(प्रतिनिधी):---
भागवताचार्य ह. भ.प.सौ. राधाताई पाटील हया आपल्या भूषण असून संत परंपरेचा वारसा ते आपल्या कीर्तन ,प्रवचन व भागवत कथेच्या सेवेच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहेत. समाजातील अंधश्रद्धा दूर करून ,शिक्षणाचे प्रमाण वाढावे आणि समाजात प्रेम, आपुलकी ,एकोपा निर्माण करण्यासोबतच लोकांच्या मनातील द्वेषाची जळमटं दूर करण्याचे काम आपल्या शैलीने त्या करीत आहेत .केवळ उपदेशाचे डोस न पाजता आधी स्वतः सामाजिक व कौटुंबिक आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
जगद्गुरु सन्मानित खान्देश कन्या भागवताचार्य ह.भ प. सौ राधाताई नागराज पाटील उर्फ माई गानकोकिळा मु.पो भोलाणे तालुका पारोळा येथील असून उत्तम कीर्तनकार ,प्रवचनकार, समाजप्रबोधनकार, कथाकार ,भागवत ,रामायण, शिवमहापुराण इत्यादी कथाकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
सन १९९७ पासून त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेला सुरुवात केली. आतापर्यंत पंधरा हजारांच्या वर कीर्तनसेवा त्यांनी केली आहे .प्रवचने तीन हजारांच्या जवळपास केली आहे तर भागवत कथा ७२ केल्या आहेत. तसेच किर्तन सेवेमध्ये गायन ही त्यांची एक स्वतंत्र ओळख आहे विविध पदे , ओवी, भजन, त्यासंदर्भातली गाणी त्या अतिशय तालासुरात व लयबद्घ गायन करीत असतात व उपस्थितांची मने जिंकत असतात म्हणून त्या खानदेशकन्या व गानकोकिळा म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या १ जानेवारी रोजी वाढदिवस आहे .आदरणीय ह. भ. प. सौ. राधाताई नागराज पाटील यांना वाढदिवसाच्या व नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. यापुढेही समाजप्रबोधनाचे समाज घडविण्याचे काम त्यांच्या हातून सदैव घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
संसाररुपी जीवन जगत असताना परमार्थरुपी जीवनासाठी तब्बल २५ वर्षे किर्तन ,भागवत, रामायण, देवीपुराण, शिवरायांचे चरित्र ,शंभूराजे, आई भवानी इत्यादी विषयांना डोळ्यासमोर ठेवून समाजात प्रबोधनकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे .त्यांनी आपली सेवा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेशात देखील त्या लोकप्रिय कीर्तनकार म्हणून ओळखल्या जातात .स्पष्टवक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. २५ वर्षे कुटुंब, संसार सांभाळून त्यांनी संघर्षमय जीवन जगत किर्तनरुपी सेवेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य त्या करीत आहेत व यापुढेही त्यांच्या हातून समाजप्रबोधनाचे कार्य सदैव घडो.
ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान.... जैशी स्थिती आहे तैशापरी राहे, कौतुक तु पाहे संचिताचे.....