*सुज्ञ व्यक्तिंना ३१ डिसेंबर किंवा नववर्ष साजरे करू नका संजय कडोळे
कारंजा दि.३०(प्रतिनिधी): सध्या 'कोरोना ' व्हायरस दिवसेंदिवस नविन अवतार घेऊन संपूर्ण जगासोबतच आपल्या महाराष्ट्र राज्याला सुद्धा घायाळ करून सोडत आहे . त्यातच बदलले हवामान आणि वातावरण यामुळे जिवघेण्या शितलहरींनी, प्रचंड गारवा निर्माण केलेला आहे . त्यामुळे सर्दि, खोकला, ताप, डोकेदुखी, आदि आजार आणि अर्धांगवायू जाण्याचे प्रकार वाढलेले असून इस्पितळामध्ये गर्दी वाढलेली असून जिल्हा प्रशासनाने सुद्धा ३१ डिसेबरच्या कार्यक्रमांवर बंदी आणलेली आहे . या काळात वातवरणामुळे अनेक जुनाट व्याधी उफाळण्याची शक्यता असून , शासनाचा आदेश अंमल करणे प्रत्येक व्यक्तिला आवश्यक असून, रात्री ९:०० नंतर, दुसरे दिवशी सकाळी ६:०० पर्यंत रात्रीची जमावबंदी व संचारबंदी सुरु आहे तरी या पाश्र्वभूमिवर कायद्याचे पालन करण्याचे दृष्टिने सुज्ञ व्यक्तिंनी मंदिर, सभागृह किंवा आपल्या निवासस्थानी थर्टी फर्स्ट साजरी करणारे किंवा नववर्षाचे स्वागत समारोह व गर्दी जमविणारे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा फटाक्याची आतिशबाजी करू नये ( अन्यथा पोलिस कार्यवाही होऊ शकते . तरी ) असे विनम्र आवाहन, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशीमद्वारे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे .