लोकनेते खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सौ उषाताई पाटील यांच्या वतीने महिलांना साड्या वाटप ...

 







लोकनेते खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सौ उषाताई पाटील यांच्या वतीने महिलांना साड्या वाटप ...

 धुळे दि.१८ (प्रतिनिधी)  दिनांक १७/१२/२०१ रोजी दुपारी ५ वाजता धुळे येथील घुगे नगर व्यंकटेश सुपर शॉप प्लॉट नंबर १११ येथे स्वामीनारायण मंदिर जवळ देवपुर धुळे येथे गरीब मोलमजुरी करणाऱ्या महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला

पद्मविभूषण माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त मा. आ.श्री अनिल अण्णा गोटे साहेब प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री तेजस अप्पासाहेब गोटे कार्याध्यक्ष धुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या संकल्पनेतून तथा आध्यक्षतेखाली

सौ हेमा ताई गोटे माजी नगराध्यक्ष धुळे व सौ संध्याताई गोटे यांच्या माध्यमातून व सौ उषाताई पाटील यांच्या वतीने घुगे नगर येथील कामगार वर्गातील हातमजुर व मोलमजुरी करणाऱ्या महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच धुळे जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील मैत्री मधील विविध स्तरातील गोरगरीब जनतेचे परताव्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच घुगे नगर परिसरातील अडी अडचणी व समस्या विषयी सौ उषाताई पाटील यांच्या माध्यमातून माजी आमदार श्री गोटे साहेब हे जातीने लक्ष घालून आहेत असे आश्वासित करीत सौ संध्याताई गोटे उषाताई पाटील यांच्या वतीने श्री पवार साहेबांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात येऊन गोर गरीब व गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या यावेळी कार्यक्रमास

सौ संध्याताई तेजस गोटे,सौ उषाताई पाटील, सौ सुरेखा ताई नांद्रे सौ शोभाताई आखाडे सौ प्रविणा ताई भावे सौ संगीता ताई कोठावदे सौ छायाताई सोमवंशी सौ अनिता ताई वाघ आदी व धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री विजय भाऊ वाघ, डॉक्टर अनिल पाटील सर, श्री प्रशांत भाऊ भदाणे,श्री राजेंद्र भाऊ कोठावदे,

श्री अविनाश भाऊ लोकरे, श्री मनोज भाऊ वाल्हे, श्री वामन तात्या मोहिते, श्री नाना भाऊ पाटील, श्री उमेश भाऊ महाले,श्री नाना पाठक आदी व धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती सौ उषाताई पाटील यांनी दिली व श्री अविनाश भाऊ लोकरे सोशल मीडिया प्रमुख व प्रसिद्धी प्रमुख यांनी प्रसिद्धीस दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने