मिरच्या मारुती शाळा प्राथमिक विद्यामंदिर शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनींना श्री अविनाश भाऊ लोकरे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप






 मिरच्या मारुती शाळा प्राथमिक विद्यामंदिर शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनींना श्री अविनाश भाऊ लोकरे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप

धुळे दि.१८(प्रतिनिधी) :पद्मविभूषण देशाचे लोकनेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त धुळे येथील मराठा पंच मंडळाचे ग्रामोद्योग विकास मंडळ संचलित मिरच्या मारुती शाळा प्राथमिक विद्यामंदिर शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनींना श्री अविनाश भाऊ लोकरे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले......

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष श्री तेजस आप्पासाहेब गोटे यांच्या संकल्पनेतून व आयोजक श्री अविनाश भाऊ लोकरे यांच्या माध्यमातून संपन्न झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री प्रमोद अण्णा साळुंके यांच्यासह संस्थेचे संचालक श्री संजय भाऊ बगदे, धुळे शहर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री विजय भाऊ वाघ ,वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील सर, श्री राजेंद्र भाऊ कोठावदे, सचिव श्री वामन तात्या मोहिते, श्री नानाभाऊ पाटील, श्री प्रवीण भाऊ राणा, श्री योगेश भाऊ कुचेरिया,श्री प्रितेश भाऊ अग्रवाल तसेच राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रमुख सौ विजया ताई साळुंके,व महिला आघाडीच्या सौ सुरेखा ताई नांद्रे, सौ गायत्री ताई पाटील, सौ ज्योती ताई चौधरी, सौ उषाताई पाटील, सौ प्रविणा ताई भावे, सौ अनिता ताई वाघ, हिमानी ताई वाघ व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ देसले ताई व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ देसले ताई यांनी दिली व धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख श्री अविनाश भाऊ लोकरे यांनी प्रसिद्ध केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने