दत्त जयंतीनिमित्त नागलवाडी गावात यात्रा उत्सव उत्साहात*
चोपडा दि. १८ (प्रतिनिधी)
*गेल्या दोन वर्षांपासून कोरोना सारखा महाभयंकर वायरस चा सामना करत असतांना अनेक यात्रा उत्सव बंद पडलेले होते ते आता या वर्षी कुठेतरी पुर्ण पदावर येत असून सालाबाद प्रमाणे नागलवाडी गावातील दत्त मंदिरांची यात्रा या वर्षी मोठ्या उत्साहात भरलेले बघायला मिळाली या यात्रा उत्साहात उत्साहीत करण्यासाठी नागलवाडी ग्रामपंचायत तर्फे विषेश आयोजन करण्यात आले व कडेकोट पणे यात्रा उत्सव निर्विघ्न पणे पार पडावा याची देखिल दक्षता नागलवाडी ग्रामपंचायतने घेतली असून गावातील भाविक भक्तानी देखिल भरघोस असा प्रतिसाद देण्यात आला या वेळी दत्त भगवानाची सामुहिक पुजा अर्चना देखिल करण्यात आली व भजन कीर्तन नाच्या स्वरात गावातील भाविक भक्त सुद्धा मंत्र मुग्ध झालेत*
*या वेळेस भगवान दत्तात्रय च्या चरणी नतमस्तक भाविक**नागलवाडीचे महाराज देवा महाराज*मंदिर चे सेवेकरी बापु सुपडु पाटील**स्वामी समर्थ भजनी मंडळ चे श्री शेखर पाटील**भाजपाचे सोशल मिडिया अॅप प्रमुख धर्मदास पाटील**भाजपाचे आर्थिक आघाडी ता अध्यक्ष नितीन राजपुत**विजय राजपूत*विपिन राजपूत*या सह भाविक भक्त उपस्थित होते*