चोपडा तालुक्यात हवामान अंदाज केंद्र स्थापने विषयी तांत्रिक पथकाकडून जागेची शोध मोहीम
चुंचाळे ता. चोपडा दि.१८(प्रतिनिधी) शेती संदर्भात उत्पादनवाढीच्या प्रयासाने शेतकऱ्यांना पिकाच्या विकासासाठी अनेक घटकांची चाचपणी करणे गरजेचे असते. निसर्गाच्या लहरीपणाचा अंदाजाचा वेध घेण्यासाठी व पिकांच्या वाढीसाठी हवामान बदलाचा अंदाज घेणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरजेचे झालेले आहे. याचा अचूक अंदाज मिळवण्यासाठी चोपडा तालुक्यात हवामान अंदाज घेण्यासाठी सहा केंद्रांची स्थापने साठी नियोजन पुणे स्थित सिमांतीक्स प्रा. लि.कंपनीच्या वतीने जागेची चाचपणी करण्यात आली. चहार्डी घाडवेल अकुलखेडे चुंचाळे कृष्णापुर मामलदे वराड बोरअजंठी नागलवाडी या गावांच्या शेतशिवार परिसरात जागेची पाहणी केली सिमांतिक्स पुणे कंपनीचे सीईओ श्री प्रदीप पाटील व सहकाऱ्यांनी तांत्रिक सर्वे केला व हवामाना संदर्भात शेतकऱ्यांसाठी मोबाईलॲप विकसित करण्यात आले. या प्रसंगी येथील विठ्ठल ॲफ्प्रो बीसीआय संस्थेचे कमिटी सदस्य श्री भरत इंगळे यांच्या सोबत परीसरातील शेतकरी. संस्थेचे कृषिदूत सर्वेकामी उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक विठ्ठल ॲफ्प्रो बीसीआय संस्थेचे अध्यक्ष मा.प्रदीपभाई गुजराथी समन्वयक संजय देशमुख व संस्थेचे संचालक मंडळाने सहकार्य केले. कंपनीच्या तांत्रिक अनुकूल स्थितीनुसार तालुक्यातील स्थान निश्चित केले जातील व मोबाईल ॲप द्वारा शेतकऱ्यांना हवामाना संदर्भात मार्गदर्शन केले जाईल असे श्री प्रदीप पाटील यांनी सर्वे करताना प्रतिक्रिया व्यक्त केली.