बी. फार्मसी महाविद्यालय, चोपडा येथे अँटी रॅगिंग संदर्भात ऑनलाईन पद्धतीने चर्चा सभा संपन्न*

 




*बी. फार्मसी महाविद्यालय, चोपडा येथे अँटी रॅगिंग संदर्भात ऑनलाईन पद्धतीने चर्चा सभा संपन्न* 

चोपडा दि.१८( प्रतिनिधी)महात्मा गांधी शिक्षण  मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातर्फ़े अँटी रॅगिंग समितीच्या दुसऱ्या सभेचे यशस्वीपणे आयोजन दिनांक 17 डिसेंबर 2021 या रोजी अकरा वाजेला ऑनलाईन पद्धतीने गूगल मीट माध्यमाद्वारे करण्यात आले. सदरच्या सभेत अँटी रॅगिंग समितीचे प्रमुख सदस्य तहसीलदार माननीय अनिल गावित यांचे प्रतिनिधी श्री महेश मुनगंटीवार, माननीय पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांचे प्रतिनिधी चोपडा शहर स्टेशनचे सहायक पोलीस  निरीक्षक श्री अजित सावळे, एनजीओ मेंबर माननीय रत्नमालाताई शिरसाट तसेच पालक प्रतिनिधी श्री. परेश पाटील, श्री विनोद पाटील व श्री रघुनाथ पाटील उपस्थित होते. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री अजित सावळे यांनी रॅगिंग संदर्भात असणारे नियम अटी व दंड या विषयावर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना यशस्वीरीत्या बहुमूल्य मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी आपल्या मार्गदर्शनात रॅगिंग या विषयाची व्याख्या समजावून सांगताना त्याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यावर कसा होईल हे समजावून सांगितले. तसेच सांगितले की आजच्या या युगात सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक गुन्हे,घटना,प्रसंग घडत आहे. शाळा कॉलेज यात रॅगिंग च्या माध्यमातून महाविद्यालयीन मुले-मुली निराशाजनक वाटचालीला वळले आहेत. आज मुला-मुली ना रॅगिंग च्या अन्यायविरोधात कायदेशीर अभ्यास करून लढा देणे आवश्यक आहे. उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉक्टर जे सी हुंडीवाले सर यांनी आपल्या शब्द सुमनांनी केले.या सभेतून रॅगिंग संबंधित विषयाचा व त्या अंतर्गत असणारे कायदे व महत्वाच्या बाबी भविष्यात विद्यार्थ्यांना नक्कीच संस्कारमय समाज घडविण्यासाठी होईल असे प्रास्ताविक पर मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांनी व्यक्त केले. सदरच्या सभेच्या आयोजनाची जबाबदारी प्रा. सौ प्रेरणा एन.जाधव व प्राध्यापक आकांक्षा पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सभेची सांगता डॉक्टर ए व्ही पाटील सर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.सभेत 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदरच्या सभेच्या  यशस्वितेकरिता महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे  अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष सौ. आशाताई पाटील व संस्थेच्या  सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदिप  पाटील यांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयचे प्रबंधक,समितीचे सदस्य, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद सर्वांच्या सहकार्याने सभा प्रभावीपणे संपन्न झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने