चोपडा महाविद्यालयात दि.३० डिसें. २०२१ रोजी माजी आमदार कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 चोपडा महाविद्यालयात दि.३० डिसें. २०२१ रोजी माजी आमदार कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन



चोपडा दि.18 (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण विकसित व्हावेत या उद्देशाने चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालय विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत असते.त्याच अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०१८ पासून माजी आमदार कै. दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन होत आले आहे.

या वर्षी ही स्पर्धा दि.३० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेसाठी  १) कोविड १९ चे जागतिक जीवनावर होणारे परिणाम.

२)अन्वयार्थ संविधान प्रस्ताविकेचा.

३)शिवकालीन जनकल्याण योजना.

४)मला आवडलेली सहित्यकृती.

५)संत तुकाराम प्रबोधनाचे विद्यापीठ.

असे पाच विषय दिले गेले आहेत.

         या वरील पाच विषयांपैकी एका विषयावर स्पर्धकास ६ मि. बोलावयाचे आहे.

सदर स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम,व्दितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ २१००₹, १५००₹, १०००₹,  ५०० ₹ रोख स्मृतीचिन्ह-प्रमाणपत्र अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

      जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाचा एक स्पर्धक या स्पर्धेत भाग घेवू शकेल. स्पर्धा निशुल्क असणार आहे.

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी उपरोक्त स्पर्धेला प्रतिसाद द्यावा. असे आवाहन वक्तृत्व मंडळ प्रमुख प्रा.संदीप भास्कर पाटील व प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने