*साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने**दशरथदादा पाटील यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सन्मान !*

 





*साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने**दशरथदादा पाटील यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सन्मान !*


ठाणे दि.३०(*प्रतिनिधी)


*दि.३०- साने गुरुजींना अपेक्षित शाश्वत मानव धर्माचे पालन करणारे, समर्पित, कृतार्थ व सार्थ जीवन जगणारे दशरथदादा पाटील यांचा त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश परब यांनी काढले.*


समाजवादी विचारवंत, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दशरथदादा पाटील यांनी नुकताच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करुन श्याहत्तर वर्षात प्रवेश केला. यानिमित्ताने साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाने त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात दशरथदादा पाटील यांचे मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष नारायण डोंगरे, सचिव महादेव नाईक व खजिनदार तुळशीदास शिरसाठ व मोठ्याप्रमाणात सभासद उपस्थित होते.


या सन्मानपत्र म्हटले आहे की, सामान्य माणूस सुद्धा महान बनू शकतो हे आजवरच्या आपल्या जीवनातील वाटचालीवरुन दिसून येते. 'माणसाने माणसावर प्रेम करावे हाच खरा धर्म आहे', या सानेगुरुजींना अभिप्रेत असलेल्या या शाश्वत मानव धर्माचे आपण पालन करीत आहात याबद्दल आम्हाल अभिमान वाटतो. आपले जीवनचरित्र सागरातील दीपस्तंभाप्रमाणे आम्हास मार्गदर्शक आहे. या जन्मावर, या जगण्यावर शतश प्रेम करावे या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचे यानिमित्ताने स्मरण होते. वयाने जरी आपण वृद्ध झालात तरी मनाने चिरतरुण आहात. आपले जीवन हे समर्पित, कृतार्थ व सार्थ जीवन आहे, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणून हे सन्मान पत्र देऊन आपल्याला सलाम करीत आहोत, अशा दशरथदादा पाटील यांच्याविषयी असलेल्या सर्व सभासदांच्या मनातील भावना या सन्मानपत्रात व्यक्त करण्यात आल्याचे साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश परब यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने