अखेर गोरगावले फाट्यावरील रस्ता* *दुरुस्तीच्या कामाला सुरुवात..*
*चोपडादि.३०(प्रतिनिधी)* शहरालगत गोरगावले फाट्यावरील रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.गोरगावले बुद्रुक खेडीभोकरी पर्यंतचा रस्ता नवीन बनवण्यात आला असून चोपडा न.प.हद्दीतील कॉलनी परिसरातील ह्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुद्धा झाले आले.परंतु यावल हायवेलगत गोरगावले फाट्यावरील रस्त्याची दुरुस्ती न करता तसेच राहू दिले होते. याबाबत वृत्तपत्रात "गोरगावले रस्त्यावरून हत्ती गेला आणि शेपूट राहिले," अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी याबाबत पाठपुरावा करताना सा.बां.चे अधिकारी प्रमोद सुशीर यांचेशी चर्चा करून फाट्यावरील रस्ता का दुरुस्त करण्यात येत नाही ? अशी विचारणा केली होती.त्यावर नवीन रस्ता बनवितांनाच्या योजनेत गोरगांवले फाट्यावरील रस्तादुरूस्तीचे काम अंदाजपत्रकात नसल्यामुळे तेवढाच रस्ता बनवायचा राहून गेला आहे,असे श्री. सुशीर यांनी सांगितले होते. परंतु जगन्नाथ बाविस्कर यांचेसह सामा.कार्यकर्ते मधुसूदन बाविस्कर,लखिचंद बाविस्कर,वैभवराज बाविस्कर यांनी केलेला सततचा पाठपुरावा व व्रुत्तपत्रीय बातम्यांचा इफेक्ट यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी तात्काळ गोरगांवले फाट्यावरिल रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली आहे.हे न होणारे काम झाल्याने गोरगांवले पंचक्रोशितील ग्रामस्थं व कॉलनीवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.