भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र व विदर्भ प्रांताची अमळनेरात १ व २ जानेवारीला होणार बैठक




 भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र व विदर्भ प्रांताची अमळनेरात १ व २ जानेवारीला होणार बैठक

जळगाव दि.३०(प्रतिनिधी):- भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र व विदर्भ प्रांताच्या कार्यकारणीची संयुक्त  निवासी  बैठक दि.१ व २ रोजी शनिवारी, रविवारी अमळनेर येथील श्री क्षेत्र मंगळग्रह मंदिराच्या सभागृहात पार पडणार आहे. बैठकित भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीची निवड केली जाणार आहे.या बैठकित किसान संघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री बाबुराव देशमुख (शेगाव),अ.भा.संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, प्रदेश संघटन मंत्री दादा लाड,महाराष्ट्र व गोवा प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील  यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.यावेळी शेती व शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत तसेच आगामी काळातील कृषी प्रगती दृष्टीने चिंतन करण्यात येणार आहे.  या निमित्ताने अमळनेर तालुका किसान संघाचे पदाधिकारी जय्यत तयारी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.त्यांना प्रांत उपाध्यक्षा कपिला मुठे,प्रांत कार्यकारणी सदस्य प्रा.मनोहर बडगुजर, जिल्हाध्यक्ष वैभव महाजन,मंत्री डॅा.दिपक पाटील यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने