धरणगाव नगरपालिकेकडून रमाई घरकुल योजने अंतर्गत घर बांधून मिळाले नाही तर..संसार उपयोगी* *सामानासह डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारकासमोर साखळी उपोषणास बसणार..बेघर नयना सोनवणे ह्यांचा ईशारा..*
धरणगाव दि.२८ (प्रतिनिधी)
धरणगाव नगरपालिकेकडून रमाई घरकुल योजने अंतर्गत घर बांधून मिळणे बाबत... नयना सुनील सोनवणे, रा. गौतम नगर धरणगाव यांनी मुख्याधिकारी नगरपालिका धरणगाव व प्रांताधिकारी यांचेकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनातून नमूद केले आहे की, मी धरणगाव येथील कायमची रहिवाशी असून माझेकडे आज तारखेपर्यंत घर नसून मी बेघर आहे. सध्या मी भाड्याच्या घरात राहत आहे. रमाई घरकुल योजने अंतर्गत घर मिळणेसाठी मी आपणास सदर निवेदन करत आहे. तसेच आमच्या भागात दलित वस्ती सुधारणा ऍक्ट अंतर्गत गौतम नगर मध्ये पाण्याची टाकी आहे पण त्यात पाणी नाही लाईट ची व्यवस्था नाही, समाजमंदिर नाही, संविधान भवन नाही, व्यायाम शाळा आहे पण त्यात समान नाही, सार्वजनिक शौचालय नाही, रमाई घरकुल आवास योजना नाही जर एवढ्या सगळ्या व्यवस्था येथे नसतील तर दलित वस्ती सुधारणा ऍक्ट मधील येणारी निधी जाते कुठे जातो असा प्रश्न उपस्थित केला आहे
रमाई घरकुल योजना दलित गरीब आणि कष्टकरी ह्या लोकांसाठी शासनाने राबवली आहे. जे मागासलेले आहेत यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शासन करत आहे पण रमाई घरकुल आवास योजने अंतर्गत शासनाने एवढे नियम अटी शर्ती लावून दिलेले आहेत अशा प्रकारे आम्हा दलितांची थट्टा करु पाहत आहे. जागा स्वत: च्या मालकाची पाहिजे, जागा सिटीसर्वे मध्ये पाहिजे, क्षेत्रफळ जास्त पाहिजे, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, १९९५ च्या मतदार यादीत उतारा १०० स्टॅम्प, ऍफिडेव्हिट, चतुःसीमा आरकीटेक चा उतारा. जिवंत माणसाचा साठी एवढे कागदपत्रे नगरपालिका आणि महाराष्ट्र सरकार हे मागत असेल तर आम्हा दलितांना मेलेले बरे कारण मेलेल्या माणसांसाठी स्मशानभूमी मध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले जातात मात्र जिवंत माणसाचे काही किंमत राहिलेली नाही. आमची किंमत फक्त निवडणुकीच्या पुरती मर्यादित राहते का. असे असेल तर हा आमच्यावर सर्वात मोठा अन्याय आहे, असं मला वाटतं आहे.जर मला दहा दिवसाचे आत घरकुल मिळाले नाही तर मी संसार उपयोगी सामान घेऊन डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या स्मारकासमोर साखळी उपोषणास बसेल असा इशारा ही दिला आहे.तसे निवेदन प्रांताधिकारी व मुख्याधिकारी नगरपालिका यांचेकडे दिला आहे.