वैजापूर आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समिती सभा संपन्न*






 वैजापूर आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समिती सभा संपन्न*


चोपडा दि.२८(प्रतिनिधी)- तालुक्यातील आदिवासी भागातील  वैजापूर येथे  प्राथमिक आरोग्य केंद्र नुकतीच रुग्ण कल्याण समितीची सभा संपन्न झाली.कृषी,दुग्ध पशुसंवर्धन सभापती तथा रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा सौ. उज्ज्वला माळके यांनी आरोग्य केंद्रातील सोयी, सुविधांचा आढावा घेतला. आरोग्याच्या सर्व सुविधा वेळच्या वेळी मिळतात की नाही याची खात्रीही केली सर्व प्रथम नव्याने रुजु झालेले समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सय्यद शोएब (उपकेंद्र कर्जाणे), डॉ.इम्रान खाटीक (उपकेंद्र देवझिरी), तदर्थ वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील बारेला तसेच नूतन आरोग्य सेवक गोविंद बारेला (उपकेंद्र देवझिरी),व संत बारेला(उपकेंद्र वैजापूर) यांचा सत्कार पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम माळके यांचे हस्ते करण्यात आला.

        रुग्ण कल्याण समितीचे सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांनी कोव्हीड-१९ लसीकरणाविषयक आढावा घेतला व यापुढील लसीकरण सत्रांचे सूक्ष्मनियोजन कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेंद्र पवार, डॉ.सुनील बारेला तसेच सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने