ग्रामसेवकासह एकाकडून १६ शेतकऱ्यांची ३६ लाखांत फसवणूक..सरकारी नोकर असूनही बनला तो व्यापारी..जि.प.चा काना डोळा..निलंबनास विलंब का? शेतकऱ्यांचा सवाल

 




ग्रामसेवकासह एकाकडून १६ शेतकऱ्यांची ३६ लाखांत फसवणूक..सरकारी नोकर असूनही बनला तो व्यापारी..जि.प.चा काना डोळा..निलंबनास विलंब का? शेतकऱ्यांचा सवाल


औरंगाबाद दि.२८(प्रतिनिधी).- औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील कार्यरत असलेल्या ग्रामसेवकासह एकाने  एकूण१६ शेतकरी यांची ३६ लाखाची फसवणुक केल्याची तक्रार जळगाव तालुका पोलीस स्टेशन काही महिन्यापुर्वी दाखल करण्यात आलेली होती.त्यानुसार संबंधित ग्रामसेवकासह अन्य एकास अटक करण्यात आलेलो होती.

    सविस्तर माहिती अशी की ,महेद्र सिताराम निकम हल्ली ग्रामसेवक म्हणून चारनेर ता सिल्लोड ( गुन्हा घडला त्यावेळी संबंधित ग्रामसेवक हा ग्रामपंचायत बोरमाळ तांडा ता. सोयगाव येथे कार्यरत होता) येथे कार्यरत असून ग्रामसेवक हा जारगाव ता. पाचोरा येथील रहिवासी असून जारगाव येथूनच त्याने केलेली संपुर्ण नोकरीचा कालावधी अपडाऊन करण्यात घालवलेला आहे.ग्रामसेवक महेंद्र सिताराम निकम याचा साथीदार अशोक रघुनाथ पाटील रा.निंभोरा ता.रावेर जि.जळगाव अर्थात ग्रामसेवक निकम यांचे जवळचे नातेवाईक असून

या दोघांनी मिळून सोळा  शेतकरी यांचे शेतावरून कच्ची केळीचा माल खरेदीने उचलून घेतली.सुरवातीला  आधी  ही काही वर्षांपुर्वी त्यांनी यातील काही दोन तीन शेतकरींसोबत केळी माल खरेदी-विक्रीचा व्यवहार केलेला असल्याने ह्या खेपेला सोळा शेतकरींनी महेंद्र निकम आणि अशोक पाटील सोबत खरेदी विक्रीचा व्यवहार केला गेला.सुरुवातीला ह्या दोघे भामट्यांनी काही प्रमाणात पैसे दिले.ह्या दोघात मुख्य सुत्रधार ग्रामसेवक महेंद्र सिताराम निकम हाच दिसून येत होता असे सोळाही शेतकरी यांचे मत आहे.

हा खरेदीचा व्यवहार साधारण २०१९ वर्षाच्या सुरुवातीला दोन ते तीन महिन्यात घडलेला व्यवहार असून सोळाही शेतकरी यांची ठगीची रक्कम रुपये ३६,६३,०५८/-(छत्तीस लाख, त्रेसष्ट हजार ,अठावन्न )ईतकी रक्कम असून हे शेतकरी यांना देणी असलेली रक्कम आहे.जी यांनी देण्यास नकार दिलेला आहे.मधली दोन वर्षे त्यांनी शेतकरी यांना पुढच्या महिन्यात देतो,पंधरा दिवसात देतोअसे आश्वासने देत चाल - ढकल करीत , वेळ मारुन नेत .शेवटी सर्वांनी मिळून त्यांचेकडून  जळगाव सेशन कोर्टात वकीलामार्फत नोटरी करुन दिली.त्यात नमूद केले गेले की ०४ जुलै २०२१ रोजी ऊर्वरित पुर्ण रक्कम महेंद्र निकम आणि अशोक पाटील यांनी शेतकरींना देतील,वेळेत न दिल्यास फौजदारी व दिवाणी कार्यवाहीस ते बांधील राहतील.त्यांनी वेळेत पैसे परत तर केलेच नाही तर तुमच्याकडुन जे होईल ते करा मी पैसे देत नाही.अशी धमकी दिल्याने दिनांक -०४अॉगस्ट २०२१ रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अशोक रघुनाथ पाटील आणि महेंद्र सिताराम निकम या दोघांवर  भारतीय दंड संहिता अन्वये कलम  ४२० , ४०६ ,३४  प्रमाणे कारवाई करण्यात येऊन या दोघांना ही अटक करण्यात आलेली होती.या घटनेबाबत जळगाव जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रे आणि न्यूज चैनल्स यांनी ही बातमी प्रकाशित झाली.

या घटनेची संपुर्ण माहितीचे निवेदने १)औरंगाबाद जिल्हाधिकारी २) औरंगाबाद जिल्हा परिषदेकडे सोळा पैकी एक शेतकरी डॉ किशोर सोनवणे यांनी दिनांक -१८/१०/२०२१ रोजी पाठवण्यात आलेली होती.परंतु औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून संबंधित कर्मचारी ग्रामसेवक महेंद्र सिताराम निकम याचेवर शिस्तभंगाची   कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. वास्तविक शासकीय नोकर असून व्यापार करणे,व्यापारात फसवणुक करणे.गुन्हा दाखल झालेला असतांना शिस्तभंगाची कार्यवाही करुन निकम याचे निलंबन करुन खातेनिहाय चौकशी करणे अपेक्षित होते.परंतु अद्यापही प्रशासनास जाग न आल्याने २२/१२/२०२१ रोजी स्मरणपत्र १ले हे पुनश्च देण्यात आलेले आहे.सर्व सोळाही शेतकरी यांची सविनयपुर्वक विनंतीकरतात की, मा.जिल्हाधिकारी औरंगाबाद आणि मा.मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,औरंगाबाद यांनी  संबंधित शासकीय कर्मचारी महेंद्र निकम यांचेवर कार्यवाही करावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने