प.पू.सती गोदावरी माता माध्यमिक विद्यालय म्हसावद येथे मॅरेथाॅन स्पर्धा संपन्न
म्हसावद:(प्रतिनिधी):प.पू.सती गोदावरी माता माध्यमिक विद्यालय म्हसावद येथे मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात 100 विद्यार्थ्यांसह शिक्षक,शिक्षिका यांनी स्पर्धेत सहभाग घेवून स्पर्धा यशस्वीरित्या पुर्ण केली. याबाबत वृत्त असे की,म्हसावद येथील स्व.रूखमाबाई सजन पाटील यांचे द्वितीय पुण्यस्मरणार्थ 3 कि.मी ,5 कि.मी. मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुनिल बि-हाडे,प्राचार्या सुरेखा गुजर,पर्यवेक्षिका संगीता जयस्वाल,अंबालाल लिमजी पाटील उपस्थित होते. क्रीडाशिक्षक सुधाकर पाटील मॅरेथाॅनचा हेतू स्पष्ट करून स्पर्धेवेळीचे नियम सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक पवार यांनी मॅरेथाॅन विषयी सांगून शाळेच्या या उपक्रमाबाबत कौतूक केले. खेळाडूंना मार्गदर्शन केले. प्राचार्या गुजर यांनी स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार,प्राचार्या सुरेखा गुजर यांचे हस्ते झेंडी दाखवून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.स्पर्धेत 100 विद्यार्थी-विद्यार्थीनींनीसह शिक्षक,शिक्षिका यांनी मोठ्या ऊत्साहात सहभाग घेवून स्पर्धा पुर्ण केली. स्पर्धेसाठी सहा गट होते.प्रत्येक गटातील प्रथम(501),द्वितीय(201),तृतीय(101),उत्तेजनार्थ(51) रूपयांचे बक्षीस,स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र देवून यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात आले.यात इयत्ता 5 वी ते 7 वी मुले मुली गटात अनुक्रमे रोहीत गिरासे,सचिन वसावे,कल्याण वाघ,प्रेमराज भोसले,योगीता मोराणकर,हर्षदा पाटील,समीक्षा अहिरे,दमयंती पाटील,इयत्ता 8 वी ते 10 वी गटात यश धनगर,रूपेशराव ठाकरे,विवेक पावरा, कृष्णा जयस्वाल,प्रियंका धनगर,गायत्री नाईक,नंदीनी गिरासे, रक्षा भोई तर शिक्षक गटात नितीन महिंद्रे,दुर्गेश्वर लांडगे,प्रशांत चौधरी,आकाश पाटील,शिक्षिका गटात सुनिता लांडगे,आरती पाटील,ज्योती पवार,पुष्पा पटेल यांनी सहभाग घेवून बक्षीस पटकावले. यावेळी विठ्ठलभाई मदन पाटील, प्रमोद पटेल,प्रतिभा पटेल,योगेश चौधरी,प्रगती चौधरी,गौरव पाटील,जयंत पाटील,सुधाकर पाटील,सुनिता पाटील,स्वरा चौधरी उपस्थित होते.ए.बी.पाटील यांनी सुत्रसंचलन केले तर सुधाकर पाटील सर्वांचे आभार व्यक्त केले.चौधरी मित्र मंडळचे अध्यक्ष शशिकांत चौधरी,तुषार चौधरी,हेमराज चौधरी,मनोज पाटील,किरण चौधरी,प्रजेश चौधरी यांनी परिश्रम घेतले तर शिक्षक राजेंद्र सुर्यवंशी,ए.बी.पाटील, डी.टी.लांडगे,विनोद ठाकरे,आकाश पाटील, नितीन महिंद्रे प्रशांत चौधरी यांनी सहकार्य केले.पोलीस बंदोबस्त,आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली होती.पो.कॉ.महाजन,तावडे,कर्मचारी हजर होते.
(फोटो:-म्हसावद येथील मॅरेथाॅन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांसह पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार,प्राचार्या सुरेखा गुजर,पर्यवेक्षिका संगीता जयस्वाल,डी.एड.च्या प्राचार्या सुनिता पाटील,शिक्षकवृंद)