महागाई विरोधात काँग्रेसचे* जोरदार जनजागृती आंदोलन*

 




*महागाई विरोधात काँग्रेसचे* जोरदार जनजागृती आंदोलन*

*चोपडा*दि.२९(प्रतिनिधी):- चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे 28 नोव्हेंबर 2021 रोजी चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महागाईविरोधात जनजागृती अभियान करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे नेते एडवोकेट संदीप सुरेश पाटील यांचे नेतृत्वाखाली या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महागाई कमी करा, पेट्रोल डिझेल गॅस चे दर कमी करा, मोदी सरकार हाय हाय, भाजपा हटाव देश बचाओ ,अशा जोरदार घोषणांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे नेते एडवोकेट संदीप पाटील यांनी बीजेपी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचून काढला. बीजेपी सरकार हटल्याशिवाय देशाचा विकास होणे नाही .यासाठी काँग्रेस पक्ष घराघरात जाऊन जनजागृती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के डी चौधरी, श्री नंदकिशोर सांगोरे., डॉक्टर अशोक कदम, रमाकांत सोनवणे, कांतीलाल सनेर, युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील, मुक्तार सय्यद , इश्त्याक जहागीरदार ,इलियास पटेल, देवकांत चौधरी ,महेंद्र चौधरी ,गोपीचंद चौधरी, सौ रोहिणी ताई पाटील,राहुल साळुंके,संजय सोनवणे, मोसिन तडवी सोहम सोनवणे ,झहीर भाई काजी, वजाहत काझी, अनिल पाटील, याकूब सेठ ,धर्मा सोनवणे, कंखरे सर ,युवराज पाटील, शशिकांत साळुंखे, महेंद्र शिरसाट, संदीप बोरसे, सुधाकर बाविस्कर, आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राहुल जी गांधी आगे बढो, सोनियाजी गांधी आगे बढो , संदीप पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने