*चोपडा* *जिल्हा* *जळगाव* *येथे* *काँग्रेस* *कडून* *संविधान* *दिन*’ *साजरा*,*डॉ* *बाबासाहेब* *आंबेडकर* *यांना* *माल्यार्पण* --
*चोपडा*दि.२९(प्रतिनिधी) :-- येथे तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने आज दि.२६ नोव्हेंबर रोजी
संविधान दिन’ निमित्ताने काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील यांनी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संविधान दिनाचा विजय असो,भारतमाता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी
भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. हा संविधान दिन पूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो.२६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली असल्याचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील यांनी सांगितले यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष के डी चौधरी, प्रदीप पाटील,रमाकांत सोनवणे,किरण सोनवणे, संजय सोनवणे, राहुल साळुंखे,देवकांत चौधरी आदी उपस्थित होते.