डॉ.चंद्रकांत बारेला यांची चारचाकी कार झाडांवर आदळली.. भीषण अपघात : परिवारासह बालबाल बचावले

 










डॉ.चंद्रकांत बारेला यांची चारचाकी कार झाडांवर आदळली..

भीषण अपघात : परिवारासह बालबाल बचावले


चोपडा दि.२८ ( प्रतिनिधी ) येथील जनसेवा हॉस्पिटलचे संचालक तथा आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत जामसिंग बारेला यांच्या वाहनाला आज दि.२८ रोजी दुपारी २ ते २: ३० वाजेच्या दरम्यान शिरपूर - चोपडा रस्त्यावरील काजीपुरा फाट्यानजीक भिषण अपघात घडला.सुदैवाने गाडीच्या चारही एअरबॅग उघडल्याने त्यांच्या पत्नी सौ सोनाली बारेला यांना किरकोळ खर्चटण्या पलीकडे जास्त इजा अथवा जखम झाली नाही.वाहन स्वतः डॉ.बारेला चालवीत होते.अपघात झालेल्या वाहनाची अवस्था बघता या दुर्घटनेत कुणी वाचले असावे हा विश्वास बसत नाही. 

याबाबत सविस्तर असे की, डॉ.चंद्रकांत बारेला हे पत्नी डॉ.सौ.सोनाली,मुलगा राजे, भाचा,व शालक ,त्याची पत्नी असे परिवारासह खाजगी कामानिमित्त इंदोर ( म.प्र.) येथे गेले होते.आज परतीच्या प्रवासात शिरपूर - चोपडा दरम्यान काजीपुरा फाट्याजवळ अचानक रस्त्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे गाडी रस्त्याच्याकडेला असणाऱ्या लिंबाच्या झाडाला जाऊन आदळली.हा अपघात इतका मोठा होता की, गाडीचे पुढचे चाक पूर्णतः वेगळे होऊन लांब पडले,गाडीचा एक्सल तुटून,ड्रायव्हर साईडचे दोनही दरवाजे नुकसानग्रस्त होऊन ब्लॉक झाले होते.गाडीची झाडाला दिलेली धडक आणि त्यामुळे उघडलेल्या चारही एअरबॅग या मुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.गाडी ऍटो सिस्टीम असल्याने 108 ला फोन लागला घटनास्थळी ताबडतोब रुग्णवाहिका देखील पोहचली.तोपर्यंत परिचयाच्या लोकांनी सर्वांना सुखरूप गाडीच्या बाहेर काढले होते. डॉ.सौ.सोनाली बारेला यांना डोक्याला किरकोळ मार लागला असून त्यांनी प्राथमिक उपचार घेतला. हा समाचार चोपडा शहरात कळताच डॉ.बारेला यांच्या हितचिंतकांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी जनसेवा हॉस्पिटलमध्ये गर्दी केली


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने