पुरूषोत्तमनगर येथील सातपुडा साखर कारखान्याचा ४७ वा गळीत हंगामाचा शुभारंभ २७ रोजी




 पुरूषोत्तमनगर येथील सातपुडा साखर कारखान्याचा ४७ वा गळीत हंगामाचा शुभारंभ २७ रोजी

म्हसावद,ता.शहादा :(प्रतिनिधी अब्बास भिल)-

शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथील श्री.सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याच्या ४७ शुभारंभ उद्या दि.२७ रोजी सकाळी ११ वाजता विधानपरिषदेच्या  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी श्री.सातपुडा  साखर कारखान्याचे चेअरमन दीपकबापू पाटीलहे उपस्थित राहणार आहेत.संगणकीकृत ऊस वजन कात्याचे पूजन माजी मंत्री तथा आ.विजयकुमार गावित,माजी आ.राजवर्धन कदमबांडे,यांच्या हस्ते होणार आहे.मिल,बॉयलर,ऑटोमेशन विभागाचे उदघाटन मुंबई येथील उधोगपती विलास वडके व सुमित वडके यांच्या हस्ते होणार आहे यावेळी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी,भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी हे उपस्थित राहणार आहेत.या गळीत हंगामाच्या कार्यक्रम ला उपस्थिती चे आवाहन व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर.प्रभारी कार्यकारी संचालक अशोक पाटील व संचालक मंडळाने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने