सामाजिक कार्यकर्ते यशवंत गोपाळ जडे यांचे दातृत्वशाली योगदान.. ज्येष्ठ नागरिक संघाला दिली २५ हजारांची मदत



 सामाजिक कार्यकर्ते यशवंत गोपाळ जडे यांचे  दातृत्वशाली योगदान.. ज्येष्ठ नागरिक संघाला दिली २५ हजारांची मदत

*चोपडा दि.२६(प्रतिनिधी):- येथील ज्येष्ठ नागरिक संघ चे सभासद यशवंत गोपाळ जडे, यांनी आपण समाजाचे  काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी नारायण वाडी मधील  ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा चे संस्थेचा हॉल , परिसर कंपाऊंड , आदी बांधकाम साठी रुपये 14000/-  मदतीचा धनादेश चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव  प्रमोद शंकर डोंगरे ( रावसाहेब) व कोषाध्यक्ष श्री. सुभाष यादवराव पाटील (गुरुजी) यांचे कडे सुपुर्द केलेला आहे. या वेळी श्रीकांत देसाई , सौ. कुंदाबाई डोंगरे हे उपस्थित होते*
*या पूर्वीही यशवंत गोपाळ जडे,  यांनी 27 जुलै 2021 रोजी ज्येष्ठ नागरिक संघाचे नारायण वाडी मधील संस्थेचा हॉल परिसर कंपाऊंड बांधकाम साठी रुपये 11000/-  मदतीचा धनादेश दिलेला होता.*
*यशवंत गोपाळ जडे,  यांनी आतापर्यंत  ज्येष्ठ नागरिक संघाचे नारायण वाडी मधील संस्थेचा हॉल परिसर कंपाऊंड बांधकाम साठी एकूण रुपये 25000/-  ची भरीव मदत केलेने त्यांचे संस्थेच्या सर्व पदाधीकार्यानी विशेष आभार मानले आहेत.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने