२० दिवसानंतर एसटीच्या सोडलेल्या तीन बसेसवर अज्ञात इसमानं कडून दगडफेक बसेसच्या काचा फोडल्या..यावल आगारात बारा कामगार रुजू
मनवेल ता.यावल दि.२८( प्रतिनिधी गोकुळ कोळी) यावल येथील एस.टी.आगारातून जळगाव साठी सोडलेल्या तीन बसेस वर, तालुक्यातील वडोदा गावाजवळ अज्ञात इसमांनी दगडफेक करून बसच्या काचा फोडल्याने बसेस पुढे जावू शकल्या नाहीत. विभाग नियंत्रकांनी कामगारांना शुक्रवारी 24 तासात रुजू होण्याबाबत नोटीस बजावल्या नंतर आगारातील बारा कामगार सेवेत रुजू झाल्यानंतर, आजारातून जळगाव येथे सोडलेल्या तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माणसेने च्या वतीने, यावल बस स्थानका बाहेर निदर्शने करीत बसेस अडवन्याचा प्रयत्न गेला मात्र तो पोलिसांनी तो हाणून पाडला पाच जणांना अटक केली असून त्यांचेवर कारवाई केली आहे.
गेल्या वीस दिवसापासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे संपातील सहभागी कामगारांना शुक्रवारी विभाग नियंत्रकांच्या वतीने, कामगारांचा संप बेकायदेशीर असल्याचे मनात 24 तासात रुजू होण्याबाबतची नोटीस बजावल्याने आहे आगारातील बारा कामगारांनी आगार प्रमुख शांताराम भालेराव यांना, विभाग नियंत्रक यांच्या नोटिशीचा संदर्भ देत रुजू होण्याबाबत चे पत्र दिले . सायंकाळी चार वाजेपासून येथील आगारातून पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतराने जळगाव साठी तीन बसेस सोडण्यात आल्या मात्र यावल पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वढोदा गावाजवळ अज्ञात इसमांनी बसेसवर दगडफेक करून एसटी च्या काचा फोडल्या घटनेचे वृत्त कळताच येथील प्रभारी पोलीस निरीक्षक कैलास नागरे फौजदार जितेंद्र खैरनार , विनोद खांडबहाले, यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आगार प्रमुख शांताराम भालेराव यांनी ही, घटनास्थळी भेट दिली आहे किती नुकसान झाले हे मात्र समजू शकले नाही रात्री उशिरापर्यंत पंचनामे करण्याची कारवाई सुरू होती
बस चालकांनी अज्ञात इसमांनी दगडफेक केली असल्याचे सांगितले
मनसेच्या वतीने आंदोलन
तेथील आगारातून बसेस सोडल्यानंतर बसस्थानकाचे बाहेर मनसेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, चेतन अडकमोल ,आकाश चोपडे ,जुगल पाटील,सुमीत घारु व कार्यकर्त्यांनी बसेस अडवण्याचा प्रयत्न केला मात्र फौजदार जितेंद्र खैरनार ,विनोद खांडबहाले ,व सहकाऱ्यांनी हाणून पाडत मनसेच्या पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.