जळगावला होणाऱ्या 3 डिसेंबर रोजीच्या 'पेन्शन संघर्ष यात्रेसाठी'.. चोपडा तालुक्याची नियोजन बैठक संपन्न..!*
चोपडा दि.२८(प्रतिनिधी): जुन्या पेन्श
न मागणी साठी राज्यभर निघालेल्या पेंशन संघर्ष यात्रेचे आगमन येत्या 3डिसेंबर २०२१ रोजी जळगाव जिल्ह्यात होत आहे.जळगाव येथे होणाऱ्या या पेंशन संघर्ष यात्रेत व पेंशन संघर्ष मेळाव्यात चोपडा तालुक्यातून जास्तीत जास्त कर्मचारी सहभागी होण्यासाठी व पेन्शन संघर्ष यात्रेचे नियोजन करण्यासाठी तालुक्यातील सर्व कर्मचारी संघटनांची संयुक्त बैठक आज दिनांक -२७/११/२०२१ शनिवार रोजी १२ वाजता विश्रामगृह चोपडा येथे संपन्न झाली..या पेन्शन संघर्ष यात्रेत सर्वांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन उपस्थित सर्व संघटना पदाधिकारी यांनी केले.. बैठकीस विविध संघटना प्रतिनिधि व DCPS/NPS धारक कर्मचारी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.