*चोपडा शहरात महिलांसाठी रविवारी योगवर्गाचा शुभारंभ*
चोपडा दि.२८:-(प्रतिनिधी)
योगाचे महत्त्व संपूर्ण विश्वाने जाणले. उत्तम व आदर्श जीवनप्रणालीसाठी योग प्रचार, योग संवर्धन व्हायला हवे. प्रत्येकाने योग शिकावा हाच ध्यास घेऊन योग प्रचार होत आहे. योगाचा ध्यास घेतलेल्या संस्थांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही योगाने झपाटले आहे. या चळवळीत महिलांनीही असायला हवे म्हणून शहादा येथील नंदुरबार जिल्ह्याच्या पतंजली महिला समिती जिल्हा प्रभारी संगीता एच.पाटील यांचे व्याख्यान आणि मार्गदर्शनाने योग वर्गाचा शुभारंभ शहरातील पंकज विद्यालय रविवारी दि २८रोजी दुपारी एक वाजता होणार आहे.चोपडा येथील सर्व योगसाधक सहेली आणि योग शिक्षिका रोहिणी पाटील यांच्या वतीने महिलांसाठी योगवर्ग आयोजित केला आहे.योगवर्गात योगाचे महत्त्व, आसने, ओंकारचे महत्त्व, अनुलोम- विलोम, प्रार्थना शिकवल्या जातील. योगवर्ग महिलांसाठी खुले आहेत, मात्र प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल. मग वाट कसली पाहताय. ज्या योगाने अवघ्या विश्वाला एकत्र आणले. त्या योगाचा वारसा जपण्यासाठी व संवर्धनासाठी योगा शिकायलाच हवा.या व्याख्यानाची वेळ रविवारी दुपारी एक वाजता असणार आहे.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकांनकडून करण्यात आहे.