न्यू महाराष्ट्र खादी भांडार व भंगाराच्या गोदामाल आग..दहा लाख रुपयांचे सामान जळून खाक


 


न्यू महाराष्ट्र खादी भांडार व भंगाराच्या गोदामाल आग..दहा लाख रुपयांचे सामान जळून खाक

 म्हसावद ,ता.शहादा दि.२८:(प्रतिनिधी):

शहादा शहरालगत असलेल्या मलोनी रोडवरील मलोणी शिवारात जकिर पिंजारी यांच्या मालकीचे न्यू महाराष्ट्र खादी भांडार व शाहरुख पिंजारी यांच्या मालकीच्या भंगाराच्या गोदामाला दुपारी बारा वाजता आग लागून दोन गोदामे जळून खाक झाली असून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.या गोदामात टायरसह भंगार भरलेले साहित्य होते.त्यात जाकिर पिंजारी यांच्या गादीभंडार मध्ये कापसा पासून चिंध्या बनवण्याचा व्यवसाय आहे. गाद्या बनवीत असताना मशीन जास्त गरम झाल्याने पेट घेतला व जवळच असलेल्या चिंध्या व कापूस मोठ्या प्रमाणात असल्याने मोठी आग लागली.बघताबघता पूर्ण गोदाम खाक झाले.मशनरी जळाली बाजूलाच असलेले शहारुख पिंजारी यांचे भंगार गोदामाने सुद्धा पेट घेतला. त्यात टायर भरलेले असल्याने आगीने मोठा भडका घेतला.परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विजविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याने शहादा नगर पालिकेचे दोन व इतर तीन अग्निशमन गाड्या दाखल झाल्या.घटनास्थळी पोलीस निरिक्षक दीपक बुधवंत, विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी सुजित पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.आग विजविण्यासाठी नगरसेवक वसीम तेली,वाहिद पिंजारी, माजीनगरसेवक संजय चौधरी यांनी सहकार्य केले.शहादा पोलिसात अग्नी उपद्रव म्हणुन गुन्ह्याची नोंद करन्यात आली आहे. यावेळी मोठया प्रमाणात नागरीक उपस्थीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने