एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तहसीलदार तळोदा यांना निवेदन..उसाच्या प्रतिटन भाव जाहीर करा मागणी



एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तहसीलदार तळोदा यांना निवेदन..उसाच्या प्रतिटन भाव जाहीर करा मागणी

 


म्हसावद ता.शहादा दि.२६ :(प्रतिनिधी):

      दि, 22 नोव्हेंबर रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तहसीलदार तळोदा यांना निवेदन देण्यात आले व निवेदनात असे म्हटले आहे की,उसाच्या प्रतिटन भाव जाहीर करण्यात यावी.

 या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा तालुक्यातील श्रीकृष्ण खांडसरी साखर उद्योग सुरू करण्यात आला असून त्याकरिता

  ऊस तोडण्याचे काम चालू झाले आहे.परंतु या खांडसरीने शेतकऱ्यांना उसाच्या दर अद्यापही जाहीर केला नसल्याने शेतकरी संभ्रमात असल्याने ऊसाचा प्रतिटन दर जाहीर करण्यात यावा.

तसेच कोरोना महामारीमुळे शेतकरी हा आर्थिक संकटात आहे म्हणून उसाला तीन हजार भाव देण्यात यावा जेणेकरून शेतकरी आपले कर्ज दूर करण्यात समर्थ होईल.

तरी,महोदय विनंती आहे की उसाच्या दर जाहीर करण्या करिता सूचना करण्यात यावी आणि तीन हजार रुपये दर प्रतिटन भाव देण्यात यावा अशी परिसरातील शेतकरी करीत आहेत,जर शेतकऱ्यांच्या या मागण्या  सहा दिवसात झाल्या नाही तर आम्ही संघटनेच्यावतीने दि,29/11/ 2021 रोजी खांडसरी बेमुदत उपोषण करणार आहेत.

याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे त्या वेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता अॅङ गणपत पाडवी अध्यक्ष दिनेश पाडवी, शहर अध्यक्ष विनोद पाडवी, सल्लागार अँड राकेश पाडवी.अॅड सखाराम ठाकरे ,जगन दादा, दारासिंग दादा, कालुसिंग दादा इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने