बामखेडा त.त.येथील ग्रामपंचायत कार्यालयात ७२ वा संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा

 बामखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिवस उत्साहात साजरा




बामखेडा त.त.येथील ग्रामपंचायत कार्यालयात ७२ वा  संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा 

म्हसावद ता.शहादा दि.२६ :( प्रतिनिधी अब्बास भिल)-

        शहादा तालुक्यातील बामखेडा त.त.येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ९:३० वाजता  ७२ रा व्या  संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  यावेळी भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ग्रामपंचायत सरपंच  मनोज चौधरी सह उपस्थितांनकडून प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रास्तविकाचे वाचन करण्यात आले. नंतर पत्रकार राकेश गवळे यांनी संविधान सभेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वपूर्ण योगदानाबद्दल माहिती दिली.

   यावेळी आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक भैय्यासाहेब गवळे ,शिवदास गव्हाणे, किरण सोनवणे, राकेश कुंवर, दगा वाघ, उमेश गवळे, ग्राम.शिपाई,राजेंद्र गवळे, सिद्धार्थ कापुरे ,रोजगार सेवक  प्रल्हाद कुलथे,संगणक चालक कैलास गवळे, भरत वडार, गणेश गवळे, दिलीप गवळे, विलास बागुल. आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने