एस.ए.मिशन येथे संविधान दिन साजरा

 


एस.ए.मिशन येथे संविधान दिन साजरा

म्हसावद ता. शहादा दि.२६:(प्रतिनिधी):- 

      शहादा तालुक्यातील मलोणी येथील एस.ए.मिशन खाजगी प्राथमिक मराठी शाळेत संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज यांनी प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असुन सर्व जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात.विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारत देश हा विविध राज्य,भाषा, वेशभूषा, संस्कृती ने संपन्न असा देश म्हणून जगात प्रसिद्ध आहे.असे प्रतिपादन प्रल्हाद राजभोज यांनी केले.


यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.एक संविधान एक देश चा संदेश देण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांनी रांगोळी,


चित्रकला व ऑनलाईन प्रास्ताविक वाचनाचे फोटो व व्हिडिओ द्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला.


     यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उषा जाधव,मंगला पाटील,भारती शेवाळे,रविकांता वसावे, 

कुणाल सोमवंशी,सोनाली पाकळे, नितिन गलराह,

अर्चना चर्वतूर यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने