शेगाव येथे ७ ला महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी जमातींचे महाअधिवेन
शेगाव दि.५(प्रतिनिधी):
*आदिवासी* *कोळी* *महासंघ* *आदिवासी* *संघर्ष* *समिती* च्या वतीने आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना न्याय हक्क मिळावा या संदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी राज्यातील एक कोटी तीस लाख आदिवासी जमातींच्या विकासासाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा आदिवासी लोक नेते *डॉ* *दशरथजी* *भांडे* *साहेब* यांच्या अध्यक्षते खाली दिनांक ७ / ११/ २०२१रविवार रोजी संत नगरी *शेगाव* जिल्हा बुलढाणा येथे *राज्य* *स्तरीय* कार्यकर्ता *मेळाव्याचे* आयोजन करण्यात आले आहे तरी या महत्वपूर्ण महाअधिवेशनाला *उत्तर* *महाराष्ट्र* *विभाग* व *जळगाव* *जिल्हा* *जळगाव* *महानगरातील* सर्व *अन्यायग्रस्त* *आदिवासी* *कोळी* समाजाच्या सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रल्हाद भाऊ सोनवणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांनी केले आहे
महाराष्ट्रात १ कोटी ३० लाख आदिवासी जमातींची संख्या असुन त्या पैकी एक कोटी आदिवासींना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवले जात आहे त्यांच्या हक्काचे व आरक्षणाचे संसदेने दिलेले हक्क राज्यातील समाजावर होणारे शैक्षणिक व नोकरी विषयक, निवडणुकीत होणा-या जात प्रमाणपत्रा यामुळे पदांवर येणारे गंडांतर अशा अनेक आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी हे एक दिवसीय *भव्य* *ऐतिहासिक* *महाअधिवेशन* आयोजित करण्यात आले आहे .
टोकरे कोळी, महादेव कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, माना, हलबा, गोवारी , मन्नेवार , मनैर , वारलू , ठाकर, ठाकुर , आदि प्रमुख कोळी आदिवासी जमाती राज्यात असुन त्यांच्या नावावर व संख्येवर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती करीता राखीव होता , राज्य व केंद्र विकास योजना आखुन दरवर्षी हाजारो कोटी रुपये त्यांच्या संख्येवर मंजूर होतात , परंतु त्याचा फायदा कोळी बांधवांना मिळत नसल्याने त्यांना संपूर्ण योजनेपासून वंचित ठेवले जात आहे, त्यामुळे राज्यातील १२ लोकसभा व ७ विधानसभा मतदारसंघात बहुसंख्येने असलेल्या संख्येमध्ये शासना च्या विरोधी असलेल्या नाराजी बाबत प्रकाश टाकण्यासाठी तसेच संपूर्ण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासंदर्भात राज्यातील माननीय मंत्री महोदय, माननीय आमदार माजी आमदार कोळी समाजाचे विविध संघटनांचे अध्यक्ष , नेते , पदाधिकारी तसेच विचारवंत कायदेशीर मार्गदर्शक अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाज बांधवांच्या उपस्थितीत महाअधिवेशन होत आहे या दि. ७ नोव्हेंबर २०२१ रविवार रोजी शेगाव येथे होणा-या अधिवेशनात माजी कॅबिनेट मंत्री तथा संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र विभाग व जळगाव जिल्हा जळगाव महानगरातील सर्व अन्यायग्रस्त कोळी समाज बांधव , कर्मचारी बांधव , महिला , युवकांनी एकसाथ एकजुटीने
लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रल्हाद भाऊ सोनवणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष,प्रभाकर अप्पा सोनवणेजिल्हा परिषद गट नेते,बाळासाहेब सैदाणेआदिवासी नेते ,नितीन भाऊ कांडेलकर ,जळगाव जिल्हाध्यक्ष जगन बापू बाविस्करजिल्हा आदिवासी नेतेमा. सुनिता ताई कोळीमहिला जिल्हाध्यक्षमंगल भाऊ कांडेलकरजगदीश भाऊ सोनवणेकर्मचारी संघटना जिल्हाध्यक्षप्रशांत भाऊ सोनवणेयुवक जिल्हाध्यक्षदिलीप भाऊ इंगळे एस टी सेवा निवृत्त संघटनासंजय भाऊ कांडेलकरमुक्ताईनगर तालुका अध्यक्षमनोहर भाऊ कोळीरावेर तालुका अध्यक्ष
जालंधर भाऊ सोनवणेयावल तालुका अध्यक्षदिपक भाऊ सोनवणे जळगाव महानगर युवक अध्यक्ष अशोक भाऊ सपकाळे जळगाव तालुका अध्यक्षकैलास भाऊ सोनवणेधरणगाव तालुका अध्यक्षशंभू अण्णा शिवरे सचिन भाऊ कोळीपाचोरा अध्यक्ष गणेश भाऊ सोनवणेभुसावळ तालुका अध्यक्ष अभिमान सुका कोळीएरंडोल तालुका अध्यक्षकिरण भाऊ कोळीअमळनेर अध्यक्षबापू भाऊ कोळीचाळीसगाव अध्यक्षजगदीश भाऊ कोळीबोदवड तालुका अध्यक्षरजनी ताई सोनवणेजिल्हा महिला मार्गदर्शक
भुषण भाऊ सपकाळे जळगाव महानगर उपाध्यक्ष यांच्या सह आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती नेते , पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य, सरपंच , ग्रामपंचायत सदस्य महिला आघाडी, युवक आघाडी , कर्मचारी संघटना, वाहतूक संघटना, तसेच सर्व अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे