जेष्ठ पत्रकार व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवले बद्दल सन्मान सोहळा*


 



नजेष्ठ पत्रकार व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवले बद्दल सन्मान सोहळा*

धरणगाव दि.७(. प्रतिनिधी)  येथील मातोश्री संस्था तसेच शिवसेना परिवार यांच्यातर्फे विविध क्षेत्रात प्राविण्य तसेच पुरस्कार मिळवलेल्या मान्यवरांच्या सत्कार सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

धरणगाव व तालुक्यातील साहित, कला ,क्रीडा ,शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विविध प्रावीण्य तसेच पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.

       त्यामध्ये धरणी साप्ताहिकाचे  संस्थापक संपादक मा. बाळासाहेब पाटील यांच्या ज्येष्ठ पत्रकार म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच धरणगाव चे सुपुत्र व्यंगचित्रकार, साहित्यिक ,लेखक ,प्रा.बी एन चौधरी सर यांना गोंदन दिवाळी अंकाच्या लेखन स्पर्धेत उत्कृष्ट कथा लेखक म्हणून पहिला क्रमांक मिळाल्या बद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले , तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य तसेच धरणगाव येथील पुरातन बालाजी मंदिराचे वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी आर पाटील सर यांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते पत्रकार अँड.वसंतराव भोलाने यांची पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  सत्कार करण्यात आला.या मान्यवरांच्या सन्मान सोहळा शिवसेना सहसंपर्कप्रमुख जळगाव गुलाबराव वाघ तसेच अखिल भारतीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

    या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना गटनेते पप्पू भावे, नगरसेवक सुरेश महाजन, अहमद पठाण ,विजय महाजन विलास महाजन ,तसेच पत्रकार व धरणगाव दक्षता समितीचे सदस्य बाळासाहेब जाधव ,विजयकुमार शुक्ल ,लोकमत प्रतिनिधी लक्ष्मण माळी, शिवसेनेचे धीरेंद्र पुरभे,राहुल रोकडे,  स्टॅम्प वेंडर व सामाजिक कार्यकर्ते सुनील बडगुजर, कांतीलाल महाजन ,नंदलाल माळी,पिंटू प्रकाश महाजन , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने