धुळे येथे राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आदिवासींना दिपावली निमित्त फराळ वाटप..






 धुळे येथे राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे  आदिवासींना दिपावली निमित्त फराळ वाटप..


धुळे दि.५(प्रतिनिधी-):*आज दिनांक ५/११/२०२१* *रोजी धुळे जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महिला आघाडी वतीने सौ शोभाताई आखाडे यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे शहर कार्याध्यक्ष श्री तेजस आप्पासाहेब गोटे यांच्या अध्यक्षतेखाली देवपुर येथील आदिवासी भिल समाजाच्या गोर गरीब व गरजू नागरिकांच्या परिवाराला दीपावली निमित्त फराळ वाटप करण्यात आले*.....

*अच्छे दिन चे गाजर दाखवून सता केंद्रित करीत अडाणी अंबानी चे मैत्रित्व जपणारे व स्वतःच्या चुकीच्या धोरणांमुळे सबंध देशा ला महागाईच्या वरवंट्याखाली सोडून देणारे केंद्र सरकारच्या चुकीच्या धरणामुळेच ऐन दिवाळीत गोरगरिबांचा गोड घास दिवसागणिक कडू होत चालला आहे*.

*अशा परिस्थितीत लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन देशातील वाढत्या महागाईच्या चक्रात अडकलेल्या सर्वसामान्यांच्या जीवनात राष्ट्रवादी काँग्रेस वतीने विधायक सामाजिक विविध उपक्रम* *राबविण्या च्या उद्देशाने व या गोष्टींचे सामाजिक व राजकीय जीवनात काम करीत असताना समाजभान ठेवीत आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* *सामाजिक न्याय विभाग महिला आघाडीच्या वतीने गोरगरीब गरजू आदिवासी भिल्ल समाजाच्या परिवारात फराळाचे वाटप करीत कार्यक्रम संपन्न झाला*.

*यावेळी धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वी. सभा.क्षेत्र.आध्यक्ष्य श्री विजय भाऊ वाघ, सचिव श्री दीपक भाऊ जाधव, श्री यशवंत भाऊ पाटील, श्री ज्ञानेश्वर पाटील, सचिव वामन तात्या मोहिते*, *प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख श्री अविनाश भाऊ लोकरे, श्री गोकुळ पाटील, श्री भोला भाऊ सैनदाने, तसेच धुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक* *अध्यक्षा शकिला बक्ष,सौ ज्योती ताई चौधरी, सौ ऊशाताई पाटील, सौ प्रवीना ताई भावे, सौ छाया ताई सोमवंशी,सौ सुरेखा ताई नांद्रे,सुष्माताई महाले आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*. 

*अशी माहिती धुळे जिल्हा राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा सौ शोभाताई आखाडे यांनी दिली व प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख श्री अविनाश भाऊ लोकरे यांनी प्रसिद्धी दिली*.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने