अबब..!मोठ्ठा दारू साठां जप्त..उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई


 



अबब..!मोठ्ठा दारू साठां जप्त..उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई


म्हसावद:दि.२९:(प्रतिनिधी):

तालुक्यातील वाडी पुनर्वसन कोरडया पोसली नदीपात्रात मध्यप्रदेश निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ४५० खोक्यांमधील १० हजार ८०० किंमतीच्या बिअर साठयासह तीन व चारचाकी मालवाहतुक कदाने वाहने वाहन असा सुमारे ३५ लाख ५५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. उर्वरीत संशयीत अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून याप्रकरणी एका संशयीताला अटक करन न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयातने दोन दिवसांची पोलीस कोठीडीत सुनावली 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व ठाणे येथील भरारी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला शहादा तालुक्यातील वाडी गावाचे हद्दीतील पुनर्वसन कोरडया पोसली नदीच्या पात्रात पहाटेच्या सुमारास एका आयशर कंपनीच्या ट्रक (क्र.एम.एच.१८-०२०४), डंपर (क्र.जी.जे.३४-टी.१३१७) व बोलोरो पिकअप (क्र.एम.एस.०४-०२०४), (क्र.जी.जे.३४-टी.१३१७) व बोलरो पिकअप (क्र.एम.एच.०४-एच.डी.५७१०) या तीन वाहनामधून महाराष्ट्र शासनाचा महसूल बडवून मध्यप्रदेश राज्यातून  आयात केलेल्या आणि केवळ मध्यप्रदेश राज्यातच विक्रीसाठी निर्मिती असलेला तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीकरीता प्रतिबंधित असलेल्या अवैध बिगर साठयाची विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या वाहतुक करण्यासाठी तीन वाहने उभी असल्याचे आढळून आली. एका ट्रकमधन दुसर्‍या दोन वाहनांमध्ये माल भरत असल्याचे दिसन आले. पथकाने धाड टाकली असता काही संशयीत अंधाराचा फायदा घेत पसार झाले तर पथकाने पाठलाग करन एकाला ताब्यात घेतले आहे. प्रत्येक वाहनाच्या हौद्यामध्ये एकाच आकाराचे खाकी रंगाचे अनेक खोके एकमेकांवर रचलेले मिळन आरले. तीन्ही वाहनांमधील खाकी खोके उघडून पाहिले असता त्यामध्ये ५०० मि.ली. क्षमतेचे मध्यप्रदेश निर्मित बिअरचे टिन आढळन आले. ताब्यात घतलेल्या इसमाकडे घटनास्थळी मिळन आलेल्य मध्यप्रदेश निर्मिती बिअर साठयांची याबाबत चोकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व नंतर कोणत्याही प्रकारच्या पावत्या नसल्याचे सांगितले हा बिअरसाठा कोणाच्या मालकी आहे हे देखील त्यास सांगिता आले नाही. याबाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जवान व्ही.सी. बस्ताव यांनी र्यिद दिली आहे. त्यानुसार मगन दखन्या वसावे (३५) रा.जीवनगर वाडीपर, कुडावद जावदा ता.शहादा याच्याविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) ८१, ८३ व ९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यास अटक करून न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. याप्रकरणाचा तपास भरारी पकिचे निरीक्षक एम.बी. चव्हाण करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने