*कॉमरेड मनोहर टाकसाळ यांचे निधन.. एक धगधगती मशाल विझली*
महाराष्ट्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे औरंगाबाद मधील येथे कॉम्रेड मनोहर एडवोकेट एडवोकेट स्वातंत्र सैनिक मनोहर टाकसाळ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. आणि चळवळ पोरकी करून निघून गेलं ते कामगार कष्टकरी चळवळीचे धग धगती मशाल होते ते काल निघून गेल्याने त्यांचे ७०वर्षे चाललेले पक्ष कार्य कम्युनिस्ट चळवळीला प्रेरणा देत राहील..त्यांचा परिचय कार्य असे.त्यांचा जन्म राजुरा जिल्हा बीड येथे १९२९साली झाला.ते निर्व्यसनी, संपूर्ण सत्यवादी,जीवन जगले वकील झाले .पण विद्यार्थी दशेत स्वातंत्र्य चळवळ कडे ओढले गेले .भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले ..
कामरेड टाकसाळ हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनेक वर्षे सचिव मंडळ, राज्य कार्य करिनीचे सभासद,नॅशनल कौन्सिल चे सदस्य व तीन वर्षे राज्य सहसचिव होते. पक्षाचे पूर्ण वेळ ते कार्यकर्ते असताना १९८१ मध्ये त्यांची व माझी शेतमजूर युनियन औरंगाबाद बैठकीचे वेळी खोकड पुर्यात भेट झाली त्यावेळी सिटी बस मधून जात असता मला का टाकसाळ यांचे कडे जायचे आहे असे मी खोकडपूर्यचे तिकीट काढताना बोललो असता त्यावेळी एक उपस्थित प्रवासी बोलला अहो टाकसाळ तेच ना.! कामुनिस्ट पक्षाचे आदर्श ना? आणि ते खरोखर आदर्शच होते.असा मला पुढील ४०वर्षे अनुभव आला. पूर्ण वेळ कार्य कर्त्याचे कठोर जीवन त्यांनी अनुभवले असल्याने कार्यकर्त्यांच्या आदी अडचणी वैचारिक कोंडमारा ची पूर्ण जाणीव होती. तत्कालीन नेते कामरेड चंद्रगुप्त चौधरी करुणा भाभी चौधरी गोविंदभाई श्रॉफ अथर बाबर का स. ना. भालेराव आदी अनेक थोर नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून ते कष्टकर्यांसठी लढले.स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन चे १०वर्षे अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे कैक वर्षे उपाध्यक्ष होते .चाळीसगाव येथे राज्य अधिवेशन घेण्याचा व ते यशस्वी करण्या त त्यांचा मोलाचा वाटा होता. ते स्वतःवर व सर्व कार्यकर्ते व जनतेवर ही सुद्धा व्हिएतनाम चे नेते हो ची मिन्ह यांच्या शिकवणूक प्रमाणेच प्रेम करीत.जळगाव जिल्ह्याचा मी भाकप सचिव झालो व आमचे नेते का स ना भालेराव व्ही बी मोरे एकामागून एक निघून गेले. हाती पैसा नाही आणि जिल्हा पक्षाचा प्रमुख झालो अशा वेळी का. मनोहर टाकसाळ यांच्या मार्ग दर्शनाने च आम्ही पक्ष सावरला. २००३ साली चोपड्यातील १००८ कुंडी यज्ञातील गावठी तूप व इतर जिंनसंची उधळपट्टी भोंदूगिरी आम्ही जेव्हा आंदोलन केले त्यावेळी का टाकसाळ यांनी चोपड्यात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठी सभा घेतली पोलिसांनी सभा ठीकानीच अटक केली. त्यावेळी पोलीस स्टेशन समोरच का टाकसाळ यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. व त्यावेळी सोबत का नामदेवराव चव्हाण ही होते व १००८कुंडी यज्ञ मध्ये चाललेल्या भोंदूगिरी विरुध्द लढ्यात सक्रिय पाठिंबा आंदोलन द्वारे उत्तर देनारे खऱ्या अर्थाने का टाकसाळ यांनी नेते पदाची जबाबदारी पार पाडली.त्यावेळी महाराष्ट्रातील व देशातील ख्यातनाम दैनिक लोकमत व गावकरीने चांगली साथ दिली. व मला भावी काळात शोषणाविरुद्ध लढण्याचे बळ त्यांनी दिले. अमळनेरला त्यांच्या मार्गदर्शन खालील जिल्हा शेतमजुर संघटना पूनररचना बैठक आम्हास शेतमजूर युनियन बांधण्यासाठी बळ देऊन गेली. जिल्हा कमिटीला येताना पक्ष वांगमय आणणे व विकणे हा त्यांचा आवडता छंद ! पुस्तक विक्रीला प्रतिसाद मिळू वा न मिळो पण पुस्तकांचे ओझे वाहण्यात त्यांनी कधी कंटाळा केला नाही.कमीपणा मानला नाही. उमर्टी येथे २००८साली आदीवासी मेळावात त्यांनी अतिशय स्फूर्तिदायक मार्गदर्शन केले. कार्यकर्त्याना पाठीवर कौतुकाची थाप मारतांना तितक्याच परखड पने दोषही त्यांच्या नजरेत आणून देत. महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल चे निवडणूका ही वकिली व्यवसायातील सिद्धांत कम्युनिस्ट विचारांवर वर
लढले. त्यावेळी जळगाव जिल्ह्यात अनेक न्यायालयात मला त्यांचा प्रचाराची संधी मिळाली जिल्हा ने काढलेले दोन पणी डिजिटल प्रचार पत्र त्यांना भावले होते. जळगाव जिल्यातील अनेक वकिलांशी त्यांची ओळख होती.चोपडा तालुक्यातील एक पोलिस पाटील निलंबित झाले त्यांना केलेले मार्गदर्शन ते आजवर विसरू शकले नाहीत. म गांधीजी न प्रमाने ते सत्यवादी व पीडित जनतेचे वकील होते का टाकसाळ यांचे निधन झालेने निर्माण झालेली पोकळी त्यांचे चिरंजीव का. अभय टाकसाळ व सहकारी निश्चितच भरून काढतील अशी खात्री आहे *रोज बेमौत मरा करते है मरणे वाले मरकर भी नहीं मरते मेहनत कशोके लिये लढणे वाले*
कामरेड टाकसाळ यांना जळगाव जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षा चा अखेरचा लाल सलाम!! *अमृत महाजन, राज्य सहसचिव लाल बावटा शेतमजूर युनियन चोपडा जि जळगाव ९८६०५२०५६०*