आनंद बाजार ' शॉपिंग मॉलचे भूमीपुजन


 





'आनंद बाजार ' शॉपिंग मॉलचे भूमीपुजन 

 

चोपडादि.३० ( प्रतिनिधी ) शहरातील प्रतिथयश डॉ. निर्मलकुमार आनंदराज टाटीया यांनी आपल्या आनंद सुपर शॉपी या यशस्वी व्यावसायिक दालना नंतर ' आनंद बाजार ' या महत्वकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे.काल दि.२९ रोजी सकाळी डॉ.निर्मल टाटीया यांच्या खास उपस्थितीत नियोजित वास्तूचे भूमिपूजन दै.खान्देश एक्सप्रेस चे मुख्य संपादक तथा प्रेरणा दर्पण फाऊंडेशन चे अध्यक्ष शाम जाधव,संपादक तथा संस्थेचे सचिव लतीश जैन,प्रेमराज गुरुजी,विनोद पाटील,राजू पाटील, नेमाडे बंधू यांच्या हस्ते करण्यात आले.

चोपडा शहरातील मेनरोड वरील डॉ.परेश टिल्लू यांच्या निवासस्थाना जवळ असलेल्या ७ हजार स्केअर फूट अशा भव्य जागेत सदरील 

 ' आनंद बाजार ' शॉपिंग मॉलचे निर्माण होणार असून यात २५ दुकानांची निर्मिती होऊन ते सर्व

व्यवसायासाठी भाडे तत्वावर उपलब्ध असणार

आहेत.सर्व सोयी - सुविधांयुक्त असे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सदरचे नियोजित शॉपिंग मॉल असल्याने व्यापारी बांधवांना व्यवसायाला नवीन संधी मिळणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने