दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी वाढवून देण्यासाठी १० हजाराची लाच घेतांना दोघांना रंगेहाथ अटक..लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक*
*चोपडा दि.३० (प्रतिनिधी) चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्ती कडून दहा रुपयांची लाच घेतांना एकास लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून जेलची हवा दाखविली आहे. आज चोपडा उप जिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तीं साठी दिव्यांग प्रमाणात पत्र वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्या शिबीर प्रसंगी दिव्यांग व्यक्ती विश्वास पाटील यांना प्रमाणात पत्र काढून देणेकामी अनिल तुकाराम पाटील व श्री. विजय रूपचंद लढे,यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली सदरील रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदार पुरुष,वय-४९, रा.कंकराज ता.पारोळा जि.जळगाव. यांना दिव्यांग प्रमाणात पत्र काढून देणेकामीश्री.अनिल तुकाराम पाटील,वय-४६, व्यवसाय-खाजगी इसम, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा जि.जळगाव. व२)* श्री. विजय रूपचंद लढे, क्य-६७,व्यवसाय-व्यापार रा.नगरदेवळा, मारवाडी गल्ली, ता.पाचोरा जि.जळगाव. हे दहा हजार रुपयांची लाच घेतांना लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
तक्रारदार हे हाताने दिव्यांग असुन त्यांना हाताचे दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र ४०% चे वर टक्केवारी वाढवुन देण्याचे यातील आरोपी क्रं.१ यांनी सांगुन संबंधीत काम ज्या डॉक्टरांकडे आहे, ते डॉक्टर माझे ओळखीचे आहे असे सांगुन तक्रारदार यांचेकडे आरोपी क्रं.१ यांनी पंचासमक्ष १०,०००/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतः आरोपी क्रं.१ यांनी उप जिल्हा रुग्णालय,चोपडा येथे पंचासमक्ष स्वीकारली व आरोपी क्रं.२ यांचेकडे दिली म्हणुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
हि धडाकेबाज कारवाई
मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व
मा.श्री. सतीश डी.भामरे, सो, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली
*पर्यवेक्षण अधिकारी-*
श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.यांच्या नेतृत्वाखाली
, PI.श्री.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी,पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ. यांनी केली .या कारवाईने दिव्यांग बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या टीम चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.