नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघांचे निवेदन
म्हसावद:(प्रतिनिधी)- -महाराष्ट्र शासन यांच्या महसूल विभाग, वनविभाग यांचे द्वारा 4 जानेवारी 2021 च्या परीपत्रकानुसार मागासवर्गीय(ओबीसी) अर्जदारस नॉन क्रीमलीयर प्रमाणपत्र साठी आवश्यक उत्पन्नाच्या दाखला देतांना आई, वडील यांचे नोकरीपासूनचे, शेती पासूनचे व वेगवेगळ्या स्रोता पासूनचे उत्पन्न वगळून इतर उत्पन्नाच्या आधारे दाखला देण्यात यावा असे आदेश आहेत परंतु शहादा तालुक्यात नॉन क्रिमीलेयर दाखले काढतांना अडचणी येत आहेत यासाठी शहादा येथील उपविभागीय प्रांतधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ चेतन गिरासे यांना माजी जि प कृषी सभापती अभिजित पाटील व नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष मुकेश पटेल यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने निवेदन दिले.
इतर मागासवर्गीय(ओबीसी ) समाजाला बिगर उन्नत गट(नॉन क्रिमिलीयर) उत्पन्न मर्यादा शासनाच्या वतीने आठ लक्ष पेक्षा जास्त करण्यात आली असून तसे शुद्धीपत्रक ही शासनाच्यामार्फत 4 जानेवारी 2021 रोजी जाहीर करण्यात आले आहे, पालकांचे शेतीचे उत्पन्न किंवा आई, वडील नोकरीला त्यांचे वेतन, सेवानिवृत्त वेतन, मानधन, अनुदान किंवा या व्यतिरिक्त इतर मार्गाने प्राप्त उत्पन्न वगळून इतर उत्पन्नाच्या आधारे उत्पन्नाच्या दाखला देण्यात यावा, सदर आदेशानुसार ई-डिस्ट्रिक्ट प्रणाली मध्ये दुरुस्ती होऊन, ऑनलाईन अर्ज सबमिट होतांना पाल्याना अडचण येते त्यात दुरुस्ती करण्यात यावी किंवा ऑफलाईन प्रस्ताव स्वीकारून उत्पन्नाच्या दाखला देण्यात यावा, जेणेकरून कुठल्याही कारणास्तव मागासवर्गीय विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची व्यवस्था करावी व शैक्षणिक नुकसान टाळावे असे आशयाचे निवेदन देण्यात आले.
माजी जि प सदस्य अभिजित पाटील यांनी, शहादा तालुक्यातील मागासवर्गीय नागरिकांना, विध्यार्थ्यांना व पालकांना नॉन क्रिमिलीयर साठी येणाऱ्या अडचणीविषयी व सेतू केंद्राच्या संचालकाकडून होणाऱ्या गैरसमजुती, व उडवाउडवी च्या उत्तरामुळे नागरिकांना नाहक त्रास होतो याविषयी प्रांतधिकारी यांना सांगितले, याविषयी प्रांतधिकारी डॉ गिरासे यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करून, नॉन क्रिमिलीयर दाखले विषयी असलेले गैरसमज व 8 लक्ष पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या पालकांना नॉनक्रिमीलेयर काढतांना कुठलीच अडचणी येत नाही, जर तशी अडचण आली किंवा सेतूकेंद्र संचालक कडून उडवा उडवीची उत्तरे दिली गेली तर कार्यालयाशी संपर्क साधावा.
सदर चर्चेवेळी माजी जि प सभापती अभिजित पाटील, मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष, प्राचार्य मुकेश पटेल, लहान शहादा विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पटेल, माजी मुख्याध्यापक नगिन पाटील, शांतीलाल पाटील, सुनील पाटील, मनोहर पटेल, जगदीश पाटील, सुरेश पाटील शांतीलाल पाटील,पत्रकार हितेश पटेल,तुषार गोसावी, अमोल पाटील, उमेश पाटील,वनश्री कंपनी चे संचालक दिनेश पाटील, हेमराज पाटिल(बाबा पाटील), बिपीन पाटील, नितीन चौधरी, निलेश पाटील, जयप्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
कोट -मागासवर्गीय नागरिकांसाठी नॉनक्रिमिलीयर उत्पन्नाची अट ही 8 लक्षपेक्षा जास्त असून ते शासकीय नोकरीत असलेले पालक अ, ब, क आणि ड वर्ग शासकीय कर्मचाऱ्यांना हे लाभ भेटत असतात, त्यामुळे कोणत्याही मागासवर्गीय नागरिकांना नॉनक्रिमिलीयर दाखला काढतांना अडचण येत असेल किंवा तालुक्यातील सेतूकेंद्र चालकाकडून उडवाउडवी ची उत्तरे भेटत असतील तर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
-डॉ चेतन गिरासे(उपविभागीय प्रांताधिकारी, शहादा )
फोटो -प्रांतधिकारी डॉ चेतन गिरासे यांना मागासवर्गीय नॉनक्रिमिलीयर विषयी निवेदन देतांना जि प माजी कृषी सभापती अभिजित पाटील, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष मुकेश पाटील, नगीन पाटील, हेमराज पाटील, सुनील पाटील, दिनेश पाटील, सुरेश पाटील आदी