सेवा धर्म परिवार आणि कला सिद्दी फाऊंडेशन तर्फे .. आगळीवेगळी भाऊबीज साजरी




सेवा धर्म परिवार आणि कला सिद्दी फाऊंडेशन तर्फे .. आगळीवेगळी  भाऊबीज साजरी

जळगाव दि.७( प्रतिनिधी):आज भावा बहिणीच्या पावित्र्य नात्यातील महत्व पूर्ण असलेला भाऊ बिजेचा सण आहेआपल्या लाडक्या भावा च्या दीर्घायुष्य साठी ओवाळणी घालण्यासाठी अनेक भाऊ बहीण आज एकत्र येत असल्याचं पाहायला मिळाले आहेएकी कडे असे चित्र असताना बेघर निवारा केंद्रातील अनेक भावाना आपली बहीण कुठे आहे हे देखील माहीत नाही अशा भावा साठी जळगाव शहरातील सेवा धर्म परिवार आणि कला सिद्दी फाऊंडेशन चे माध्यमातून भाऊ बिजेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते

यावेळी जळगाव च्या महापौर जयश्री महाजन यांनी बेघर निवारा केंद्रातील कुटुंबा पासून वंचित असलेल्या आपल्या निराधार भावांना ओवाळणी करीत आणि त्यांच्या सोबत फराळ करून आपल्या मधील सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला आहे

      भाऊ विजेचा सण हा भावा बहिणीच्या नात्यातील सर्वात महत्व पूर्ण सण मानला जातो आज अनेक भाऊ आपल्या बहिणीला काही तरी भेट द्यावी या साठी प्रयत्नात आहेत तर आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे या साठी बहीण ओवाळणी करून त्याला शुभेच्या देत असते

 या सणाची आज सर्वत्र धाम धूम सुरू असताना जळगाव शहरातील बेघर निवारा केंद्रातील कुटुंबा पासून वंचित असलेल्या भावा बहिणी साठी आपण काही केले पाहिजे अस लक्षात आल्यावर सेवा धर्म परिवार आणि कला सिद्दी फाऊंडेशन चे वतीने आज बेघर निवारा केंद्रात भाऊ बीजेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते

यावेळी जळगाव च्या महापौर जयश्री महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती 

बेघर निवारा केंद्रातील बंधूंच्या सोबत त्यांनी ओवाळणी  आणि दिवाळीचा फराळ करीत भाऊ बीज साजरी केली 

कुटुंबा पासून वंचित असलेल्या बेघर निवारा केंद्रात असलेल्या बंधू आणि भगिनी सोबत भाऊ बीज साजरी करण्याचा आपल्याला खूप आनंद झाला असल्याचं महापौर जयश्री महाजन यांनी.म्हटल आहे

 सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कला सिद्दी फाऊंडेशन आणि सेवा धर्म परिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या या कार्यक्रमा चे जयश्री महाजन यांनी कौतुक केले आहे

    या आगळ्या वेगळ्या भाऊ बीजेच्या कार्यक्रमाची संकलपना कला सिद्दी फाऊंडेशन च्या अध्यक्षा आरती शिंपी यांनी स्पष्ट केली आणि महापौर जयश्री महाजन यांचं पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

या वेळी कला सिद्दी फाऊंडेशन अध्यक्षा आरती शिंपी, भारती बेबी ताई  खोडपे,निशा पवार,पुनम खैरनार , अॅड. वैशाली बोरसे, भारती कुमावत , रुपाली चौधरी , माधुरी शिंपी , शीतल माळी  इत्यादी मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सेवा धर्म परिवाराचे चंद्रशेखर नेवे,संजय साळुंखे,बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी,शीतल धनगर,राजेश खोडपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

आभार प्रदर्शन भारती कुमावत यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने