चिमठाणे येथील युवा अभिनेता प्रशांत गोरे यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र हा युवा कला गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला*....

 









*चिमठाणे येथील युवा अभिनेता प्रशांत गोरे यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र हा युवा कला गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला*....

चिमठाणे,ता.शिंदखेडा दि.२८(प्रतिनिधी प्रवीण भोई)

शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावातील  रहिवाशी असलेले  युवा अभिनेता प्रशांत गोरे यांना " अभिनय " या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फौंडेशन कडून हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात आला आहे. या क्षेत्रातील एक नवोदित अभिनेता म्हणून त्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.प्रशांत गोरे यांनी कला क्षेत्रात दिलेले योगदान (,पथनाट्य,प्रायोगिक नाटक,व्यवसाहिक नाटक,Tv मालिका,अल्बम सॉंग, वेबसिरीज,चित्रपट ,)अशा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या भूमिका साकारल्याबद्दल  त्यांना हा कला गौरव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..

 या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की आर्ट बिटस् ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबविले जातात.प्रशांत गोरे यांचे चिमठाणे परिसरात सर्वदुर कौतुक होत आहे.....


प्रशांत गोरे यांनी गेल्या चार वर्षात कला क्षेत्रात केलेली कामगिरी व अभिनय .........

......जय मल्हार ,माझ्या नवऱ्याची बायको,बाळू मामा,तू माझा सांगाती, क्राईम पेट्रोल,या सारख्या अनेक नावाजलेल्या मालिकांमध्ये कामे केली आहेत..5 व्यावसाहिक नाटक,2 महानाट्य ,वेबसिरीज ,1 राज्यस्तरीय ,एकांकिका स्पर्धा,3 मराठी अलबम सॉंग, त्या पैकी कोरोनावर आधारित बापूसाहेब मे माने यांचे दिग्दर्शित कोरोना हायना हे गाणं टीव्हीवर चांगलंच व्हायरल झाला होतं...अजून 3 नवीन प्रोजेक्ट लवकरच रिलीज होतील व आता पर्यंतचा मिळालेला हा सर्वात मोठा सन्मान आणि पुरस्कार  अस त्यांनी सांगितलं ......

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने