आदीवासी संघर्ष समीतीच्या अधिवेशनात समाज बांधवानी उपस्थित रहा: जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे
मनवेल ता.यावल दि.३(प्रतिनीधी)श्रीक्षेत्र, शेगाव येथे आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.७ नोव्हेंबर २०२१ (रविवार) रोजी स.९ ते सायं.५ या वेळात हॉटेल कृष्ण कॉटेज, कान्हा उत्सव हॉल,खामगाव रोड, शेगाव (जि.बुलढाणा) या ठिकाणी कोळी समाजाचे राज्यस्तरीय भव्य अधिवेशन व महामेळावा आयोजित करण्यात येत आहे. ह्या अधिवेशनात आदिवासी कोळी जमात व अन्य ३३ अन्यायग्रस्तं जमातींचे समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनाहि विशेष आमंत्रित करण्यात आलेले आहे या अधिवेशनात समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन जि.प.गटनेते तथा प्रदेशाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी यावल येथे आदीवासी कोळी समाज बांधवाच्या बैठकीत आवाहन केले.
यावल खरेदी विक्री संघाच्या कार्यलयात आज आदीवासी कोळी समाज बांधवाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी या बैठकीत पाडळसा येथील सरपंच खेमचंद कोळी, वढोदा सरपंच संदिपभैया सोनवणे ,कोळन्हावी सरपंच विकास सोळंके ,बामणोद राहुल तायडे, समाधान सोनवणे,मनवेल येथील पत्रकार गोकुळ कोळी,प्रमोद सोनवणे, मोहन सोनवणे, योगेश कोळी, अमर कोळी,गोकुळ सोनवणे , सागर कोळी, चिंधु कोळी, कीरण तायडे, पांडुरंग महाले, विनोद झाल्टे तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व समाज बांधव उपस्थित होते
ह्या अधिवेशनात सामाजिक लढ्यासाठी पुढील दिशा ठरविण्यात येणार असून अनेक मोठे निर्णयही घेतले जाणार आहेत. तसेच अधिसंख्य कर्मचारी,अधिकारी यांचे वेतन,वेतनवाढ तसेच सेवानिवृत्ती धारकांचे देय, निवृत्तीलाभ,जात प्रमाणपत्र,वैधता प्रमाणपत्र या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले.