महाराष्ट्र केसरी कुस्ती धुळे तालुका चाचणी स्पर्धेत जय वाल्मिकी व्यायाम शाळेचा मल्ल पै.पुंडलिक कोळी यांचे चिरंजीव पै.विक्की पुंडलिक कोळी 86 kg वजन गटात प्रथम
धुळे दि.४(प्रतिनिधी):*महाराष्ट्र केसरी कुस्ती धुळे तालुका चाचणी स्पर्धेत अधिवेशनात जय वाल्मिकी व्यायाम शाळेचा मल्ल पै.पुंडलिक कोळी यांचे चिरंजीव पै.विक्की पुंडलिक कोळी 86 kg वजन गटात याने उत्कृष्ठ कुस्त्या करून प्रथम क्रमांक मिळविला....
*महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात नावाजलेले गाव=न्याहळोद*
ज्या प्रमाणे महाराष्ट्रात कोल्हापूर हे मल्लांसाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे न्याहळोद हे गाव धुळे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा मल्लांसाठी प्रसिद्ध आहे....................
या पंचक्रोशीत कुठे ही गेले असता....
तिथले व्यक्ती सांगत की...तुम्ही ह्या पैलवानांच्या गावाचे का?आज पण न्याहळोद गावाचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर गाजविणारे मल्ल हे न्याहळोद गावात आहेत.....
कै.पैलवान.राजधर कोळी, कै.पैलवान.रामभाऊ कोळी, पैलवान. कै.शालिक गांगुर्डे, कोळी.पैलवान,कै.छोटू उस्मान पठाण पैलवान,कै.पैलवान. भगवान माळी,श्री. देविदास आण्णा पैलवान,श्री.ज्ञानेश्वर पैलवान,श्री.अर्जुन दादा पैलवान, श्री. पुंडलिक कोळी, पैलवान,श्री.राजाराम सैंदाणे पैलवान, श्री.रघुनाथ पवार पैलवान, श्री.बाबा कोळी, पैलवान. प्रकाश वाघ, आबाजी कोळी,पैलवान. श्री.नेहरू सुरवंशी, पैलवान. सुनिल पवार,पैलवान,श्री.पिंटू काका कोळी, पैलवान.श्री.सुनील धोबी पैलवान,श्री. सावकार कोळी पैलवान, श्री. मोहन कोळी पैलवान,श्री. रोहिदास कोळी पैलवान, कै.कैलास कोळी पैलवान, श्री. दिलीप वाघ, पैलवान.राकेश पवार,पैलवान. साहेबराव मालचे, पैलवान. राजू मालचे. पैलवान. संजय भिल, नामदेव भिल, पैलवान.बापूभाऊ भिल, पैलवान असे पैलवान हे न्याहळोद गावाने दिले.......या मल्लांनी न्याहळोद गावाचे नाव महाराष्ट्रात गाजवले.................
आज सुद्धा पै.जगदीश रोकडे, पै. गणेश वाघ,पै. विक्की कोळी या सारखे मल्ल गावाचे नाव लौकिक करीत आहे......
पै.विक्की कोळी यास कुस्ती क्षेत्रात त्यास बालपणापासून या क्षेत्रात आवड होती.....
त्याचे कारण ही तसेच मोठे काका श्री.अर्जुन दादा पैलवान व वडील श्री. पुंडलिक कोळी पैलवान व काही भावंडे कुस्ती क्षेत्रात होते.....पै. विक्की कोळी यांचे वडीलांनी म्हणजेच श्री. पुंडलिक कोळी पैलवान यांनी भरपूर आखाडे गाजविले.....
चांगल्या-चांगल्या मल्लांना त्यांचे नाव ऐकून घाम फुटायचा...... म्हणून पै. विक्कीला बालपणापासूनच कुस्तीचे धडे मिळू लागले.................
तसे पाहायला गेले तर गावात दोन व्यायाम शाळा 1) बजरंग व्यायाम शाळा 2) सम्राट व्यायाम शाळा ........अशा या दोन व्यायाम शाळा.........
दोन्ही व्यायाम शाळेने गावाला मोठ-मोठे मल्ल दिले......
अधिवेशनात नाव देण्यासाठी मल्लांना संधी मिळत नव्हती म्हणून बजरंग व्यायाम शाळेतच दुसरी शाखा म्हणून जय वाल्मिकी विजय व्यायाम शाळा .....
त्याचे प्रतिफळ म्हणजे पै.विक्की कोळी या रूपाने नवीन मल्लाला संधी मिळाली आणि त्या संधीचे सोनेही करून दाखविले......