35 वर्ष विस्थापित हनुमान कोळी वाडाचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार .. श्री नरेश कोळी यांच्या प्रयत्नाला यश ..अखिल भारतीय युवा कोली कोरी समाज दिल्लीचे राष्ट्रीय नेते मा.श्री ईजि.खेमचंदजी कोली यांनी केले मोलाचे योगदान
मुंबई (प्रतिनिधी )दि.२६:*35 वर्ष विस्थापित हनुमान कोळी वाडा चा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्नशील श्री नरेश कोळी यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असेच म्हणावे लागेल श्री. नरेश कोळी दिल्लीत असताना त्यांनी श्री. संजीवभाई शिरसाठ महाराष्ट्र प्रभारी,डॉ. राजेंद्र सावळे यांना दिल्ली हुन फोन केला की दिल्लीत आपले समाजाचे कोणी चांगले नेते आहेत का?*त्यावेळी अखिल भारतीय युवा कोली कोरी समाज दिल्लीचे राष्ट्रीय नेते मा.श्री ईजि.खेमचंदजी कोली यांच्याशी संपर्क केला असता उरण कोळी वाडा मुंबई चे नरेशजी कोळी तुमच्या कडे येत आहेत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले*
*व त्याप्रमाणे ते श्री. नरेशभाऊ मा. ईजि खेमचंदजी कोली यांचे कडे गेले असता त्यांनी कायदेशीर लेखी निवेदने देऊन सर्वोतोपरी सहकार्य केले.त्यानी मा.पंतप्रधान साहेब, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री मा.उद्ववजी ठाकरे, राज्यपाल मा.भगतसिंग कोशारी साहेब, मा जिल्हा अधिकारी रायगड ,चेअरमन जेएनपिटी कंपनी या सर्वां सोबत मा.ईजि खेमचंदजी कोली यांनी चर्चा करून विस्थापित हुनमान कोळी वाडा चा 35 वर्षा पासून रेंगाळत असलेला प्रश्न आज बऱ्याच प्रमाणात मार्गी लागला आहे.*
*जिल्हाधिकारी रायगड यांच्या मार्गदर्शनानुसार पुनर्वसनाकरिता आवश्यक असणारी 710 गुंठे जागा जे एन पी टी च्या कडून ताब्यात घेऊन ती हनुमान कोळी वाडा गावाच्या पुनर्वसनासाठी देण्यात आली.आता शासन्याच्या मापदंडानुसार लवकर हनुमान कोळी वाडा गावचे पुनर्वसन करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी पनवेलचे राहुल मुंडके साहेबानी सांगितले.*
या कामासाठी सतत प्रयत्नशील असलेले श्री नरेश भाऊ कोळी यांच्या प्रयत्नामुळे विस्थापित हुनमान कोळी वाडा उत्साहीत होवुन फटाके फोडून आनंद व्यक्त करित आहेत.आज श्री नरेशभाऊ कोळी यांना यांचे सामाजिक काम पाहून अखिल भारतीय युवा कोली कोरी समाज दिल्ली शाखा महाराष्ट्र प्रदेश च्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे श्री संजीवभाई शिरसाठ प्रदेश प्रभारी, श्री शिवा महाराज भांडे, प्रदेश अध्यक्ष, श्री डॉ. राजेंद्र सावळे यांनी नरेशभाऊ कोळी यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिलेत!!*