शारदा विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा*

 



*शारदा विद्या  मंदीर व कनिष्ठ  महाविद्यालय साकळी येथे  26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा* 

मनवेल ता.यावल दि.२६(प्रतिनिधी )

  दि 26नोव्हेंबर2021  शुक्रवारी शारदा विद्या  मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला

   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री जी पी बोरसे हे होते तर यावेळी व्यासपीठावर डॉ निशा निकुंभ , डॉ महेंद्र चौधरी, पर्यवेक्षक  श्री एस जे पवार,श्री आर जे महाजन ,श्री वाय एस सोनवणेश्री डी एल चांदणे ,   हे उपस्थित होते.  यावेळी  मान्यवरांच्या  शुभहस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांची प्रतिमा व संविधान प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

यानंतर विद्यालयातील पर्यवेक्षक श्री एस जे पवार, यांनी संविधानाचे वाचन केले यानंतर विद्यालयातील उपशिक्षक श्री आर जे महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर कार्यक्रमात निबंध स्पर्धेचे व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले याचे कामकाज श्री जे पी पाटील, श्रीमती के एम देसले  यांनी पाहिले

       यानंतर कार्यक्रमाचे  अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री जी पी बोरसे  यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,संविधानाची उद्देशीका, स्वातंत्र्य,लोकशाही,

धर्मनिरपेक्षता  याविषयी सखोलपणे मार्गदर्शन केले

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री के आर सोनवणे यांनी केले.

    सदर  कार्यक्रमाच्या     

यशस्वीतेसाठी विद्यालयाचे  प्राचार्य,पर्यवेक्षक ,शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने