शिंदखेडा दि.०२(तालुका प्रतिनिधी यादवराव सावंत): - येथील भिल समाज विकास मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चिमठाणे येथील भिल समाजातील सरपंच खंडु वंजी भिल ह्यांच्यावर राजकीय द्वेषापोटी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन खोटा गुन्हा दाखल केला आहे.त्याची लोकप्रियता काही उच्चभ्रू समाजात खटकत आहे.म्हणुन खोटे आरोप लावुन त्यांना हया प्रकरणात दोषी ठरवून त्रास दिला जातो आहे.जिल्हाधिकारी ह्यांनी सदर प्रकरणास लक्ष वेधून समिती स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.त्यानंतर निवेदन देण्यात आले.निवेदन देण्यासाठी पत्रकार यांना मज्जाव करण्यात आला.सदर सदर प्रकरणास न्याय न मिळाल्यास राज्यपाल यांच्या कडे धाव घेतली जाईल असे भिल समाज विकास मंचच्या संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी सांगितले.हयावेळी खानदेशातील मोठ्या प्रमाणात समाज महिला व बांधव उपस्थित होते.हयावेळी एकलव्य संघटना यांनी देखील पाठिंबा दिला.प्रसंगी चंद्रकांत सोनवणे.शामा ठाकरे.मन्साराम मालचे, राजेश मालचे,छोटु मोरे ,बापु देवरे, रवींद्र वाघ, यमुना भिल,अनुबाई भिल,अरुणा मारणे सुरेश भिल, नवल सिंग मालचे, एकलव्य संघटनेचे दिपक मोरे अँड.सजन वाघ यांच्या सह शोकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
*शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात चिमठाणे सरपंच खंडु भिल यांच्या वर खोटे गुन्हा मागे घेण्यासाठी निदर्शने व निवेदन.*
Zatpat Polkhol News
0
शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात चिमठाणे सरपंच खंडु भिल यांच्या वर खोटे गुन्हा मागे घेण्यासाठी निदर्शने व निवेदन.*
Zatpat Polkhol News
खानदेशातील वाचकाचे चाहते वृत्तपत्र *"दैनिक जनशक्ती*" या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून 15 वर्षाच्या कारकीर्दीत समाज हिताचे लिखाण करून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान दिले आहे. वृत्तपत्र क्षेत्रात जाहिरात, बातम्या सर्वच विभागात कामाची हातोटी असल्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे राजकीय. सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय देऊन निस्वार्थी, निगर्वीपणे पुढे आलो आहे. शिवाय साप्ताहिक चौखंबा वृत्तपत्राचे उपसंपादक म्हणून काम केले आहे. "दिवाळी विशेषांक" खास शैलीत काढले आहेत. महाराष्ट्र 99 न्यूज चॅनेलचे उपसंपादक म्हणून कामगिरी बजावली आहे. आदिवासी, दिव्यांग दीन-दलित व वंचित समाज गोर गरिबांची सेवा अविरतपणे बजावित आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून जनतेला सेवा देण्यासाठी तत्पर आहे. भ्रष्टाचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी *"झटपट पोलखोल न्यूज"* लेखणी सुरूवात केली आहे.
भविष्यात सर्व सामान्य गोर गरिब व वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान देणार असून अन्याय व भ्रष्टाचार विरोधी धारदार लेखनीने आवाज उठवून न्याय देण्यासाठी झिजणार आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थी, लोकांपर्यंत पोहोचून शासन योजना पोहचविण्याची मोलाची जबाबदारी पार पाडून जन जागृती अभियान राबविणार आहोत